टिकटॉकनंतर आता शेअर चॅटवर मायक्रोसॉफ्टची नजर !

07 Aug 2020 17:16:12
Share Chat _1  
 
 
 
 

७५० कोटींची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकन दिग्गज कंपनी मानली जाणाऱ्या टिकटॉकनंतर आता शेअर चॅटमध्येही गुंतवणूक करणार असल्याची चर्चा आहे. टिकटॉक खरेदी करण्याच्या अंतिम टप्प्यात असलेल्या मायक्रोसॉफ्टने आता आपला रोख शेअरचॅटही खरेदी केली जाणार आहे. माइक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन शेअर चॅटमध्ये १० कोटी डॉलर्स (७५० कोटी रुपये) गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे. शेअर चॅटने याबद्दल अद्याप अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.


शेअर चॅट आपल्या गुंतवणूकदारांकडून महसुल गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे. आपल्या जुन्या गुंतवणूकांसह चर्चा करुन या संदर्भातील निर्णय घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी ट्विटरने शेअर चॅटमध्ये गुंतवणूक केली होती. त्यावेळी कंपनीचे एकूण भांडवल ६५ कोटी डॉलर (४८ हजार कोटी रुपये) इतके ठरवण्यात आले होते.


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर चॅट आणि मायक्रोसॉफ्टची अशी भागीदारी झाली तर ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. ही गुंतवणूक शेअरचॅटला भारतातील पसारा वाढवण्यासाठी मदत करू शकेल. शेअर चॅट चार वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आले आहे. सध्या शेअरचॅटवर एकूण १५ कोटी युझर्स नोंदणीकृत आहेत. तसेच सहा कोटी सक्रीय युझर्सही कार्यरत आहेत. हे अॅप १५ भाषांमध्ये उपलब्ध आहे. हिंदी, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी, तेलुगु, तमिळ, बंगाली, ओडिया, कन्नड़, असमिया, हरियाणवी, राजस्थानी, भोजपुरी आणि उर्दू आदी भाषांचा सामावेश आहे.



शेयर चॅटने टिकटॉकप्रमाणेच व्हीडिओ शेअरींग अॅप मोज लॉन्च केले आहे. याचे दहा लाखांहून अधिक डाऊनलोड्स झाले आहेत. या अॅपला आत्तापर्यत ४ हजारांहून जास्त रिव्हयू मिळत आहेत. भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चीनी अॅप्स बंद केले त्यावेळेस हे अॅप लॉन्च करण्यात आले होते. टिकटॉकला पर्याय म्हणून हा व्हिडिओ प्लॅटफॉर्म उदयास आला.





Powered By Sangraha 9.0