व्यापारी, दुकानदार आणि लघु उद्योगांना फायदेशीर डिव्हाईस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020
Total Views |

Mswipe _1  H x

 
मुंबई : एमएसएमई उद्योजक आणि व्यापारी यांना डिजिटल स्वरुपात पैशांची देव-घेव करता यावी, तसेच या करीता त्यांना जास्त किंमत मोजावी लागू नये, या उद्देशाने ‘एमस्वाईप’ या कंपनीने ‘बॅंक बॉक्स’ हे सोल्युशन सादर केले आहे. अखंडीत व एकीकृत स्वरुपाची सेवा देणाऱ्या या भविष्यकालीन ‘पेमेंट सोल्युशन प्लॅटफॉर्म’च्या माध्यमातून ‘एमस्वाईप’ने एमएसएम उद्योजक व व्यापारी यांच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पीओएस टर्निमल’साठी वारंवार भरावे लागणारे भाडे किंवा ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ हे खर्च या बॅंक बॉक्समध्ये वाचतात.
 
 
 
सुमारे ६.७५ लाख पीओएस आणि ११ लाख ‘क्यूआर’संलग्न व्यापारी इतके मोठे नेटवर्क असणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या व्यापारी सेवा देणाऱ्या ‘एमस्वाईप’ने, एकमेवाद्वितीय असे बॅंक बॉक्स हे उत्पादन निर्माण केले आहे. पैसे काढणे व पैसे भरणे ही दोन्ही कार्ये एकाच उपकरणातून करता येतील असा हा प्लॅटफॉर्म आहे. ‘साईनअप’ करण्यातील सोपेपणा, ‘टर्मिनल’चे त्वरीत सक्रियकरण आणि व्यापाऱ्यांसाठी आजीवन शून्य भाडे व शून्य प्रभावाने ‘एमडीआर’ शुल्क, अशी याची वैशिष्ट्ये आहेत.
 
 
 
‘एमस्वाईप’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष पटेल म्हणाले, “कोविड-१९’मुळे छोट्या व्यावसायिकांच्या कमाईवर लक्षणीय परिणाम झाला आहे; परिणामी त्यांना अनेक खर्च कमी करण्यास भाग पडले आहे. बाजारपेठेत नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करणारी कंपनी या नात्याने ‘एमस्वाईप’तर्फे एमएसएम उद्योजकांना व व्यापाऱ्यांना डिजिटल स्वरुपात पैसे स्वीकारणारे, त्याच प्रकारे पेमेंट करणारे आणि हे करीत असताना खर्चांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करणारे सोल्युशन देण्यात येत आहे. ‘एमस्वाईप’च्या ‘बॅक बॉक्स’च्या माध्यमातून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना कमीतकमी ‘टीसीओ’मध्ये ‘डिजिटल इकोसिस्टम’ वापरण्याची आणि बँक खाते नसले तरीही ‘साईनअप’ करण्याची सुविधा मिळते.”
 
 
 
एकदाच डिजिटल केवायसी करून व्यावसायिकांना ‘बँक बॉक्स’ त्वरीत मिळवता येते. यामध्ये दोन प्रकार आहेत. ‘बॅक बॉक्स गो’ या प्रकारात शून्य भाडे आणि शून्य एमडीआर या सुविधा आहेत, तर ‘बँक बॉक्स लाइट’ यामध्ये ‘क्यूआर सोल्यूशन’सह शून्य भाडे व सर्व व्यवहारांवर 1 टक्का कॅशबॅक या सुविधा आहेत. या दोन्ही प्रकारांमध्ये व्यापाऱ्यांना ‘यूपीआय क्यूआर’ आणि ‘मनीबॅक कार्ड’ मिळते. या व्यतिरिक्त, ‘बँक बॉक्स गो’मध्ये ‘चिप + पिन’ आणि ‘कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंट’ स्वीकारण्यास सक्षम असा एक परवडणारा ‘एमपीओएस’ मिळतो. ‘बँक बॉक्स गो’साठी व्यापाऱ्यांना 4 हजार रुपयांचे शुल्क अधिक कर इतकी रक्कम एकदाच भरावी लागेल, तर ‘बँक बॉक्स लाइट’साठी केवळ 199 रुपये अधिक कर इतके पैसे भरावे लागतील.
 
 
 
 
‘एमस्वाईप’चे ‘स्ट्रॅटेजी व ऑपरेशन्स’ या विभागाचे प्रमुख समीर होडा म्हणाले, “बँक बॉक्स’च्या सहाय्याने आम्ही अगदी छोट्या व्यावसायिकांना डिजिटल स्वीकृती व ‘पेमेंट्स इकोसिस्टम’च्या यंत्रणेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. एमस्वाईप आता पैसे घेण्याचे व देण्याचेही काम करीत असल्याने, आम्ही एमएसएमई आणि व्यापार्‍यांना ‘एंड-टू-एंड डिजिटल व्यवहार’ करण्याची सुविधा प्रदान केली आहे, तसेच त्यांना ‘डिजिटल भारत’ चळवळीत सहभागी होण्यास सक्षम केले आहे.”
 
 
 
 
‘एमपीओएस’मधून यूपीआय, व्हिसा, मास्टरकार्ड आणि अमेरिकन एक्सप्रेस यांसह अनेक प्रकारची देयके स्वीकारली जातात, तर ‘एमक्यूआर’मधून १५० पेक्षा जास्त यूपीआय, तसेच पेटीएम, अ‍ॅक्सिस बँक आणि भिम यांसारख्या मोबाइल बँकिंग अ‍ॅप्सद्वारे देयके स्वीकारली जातात. डिजिटल स्वरुपात खर्च करण्यासाठी व्यापारी दरमहा 1 लाख रुपयांपर्यंत आपले ‘एमकार्ड’ लोड करू शकतात. मध्यम व लहान गावांमधील दोन ते अडीच हजार रुपयांचे दररोजचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना, तसेच, मेट्रो व निमशहरी भागांतील ८ ते १० हजार रुपयांचे दररोजचे व्यवहार असणाऱ्या व्यावसायिकांना डोळ्यापुढे ठेवून ‘एमस्वाईप’ने ‘बॅंक बॉक्स’ सादर केले आहेत.
 
 
‘एमस्वाईप’ विषयी: अखंडीत स्वरुपाचे मोबाइल पीओएस आणि मूल्यवर्धित सेवा प्रदान करून एसएमई आणि व्यापाऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठा आर्थिकसेवा मंच बनण्याचे ‘एमस्वाईप’चे लक्ष्य आहे. देशभरातील ६.७५ लाख पीओएस आणि १० लाख क्यूआर मर्चंट यांचे नेटवर्क असणारी ही कंपनी देशातील सर्वात मोठी स्वतंत्र मोबाईल ‘पीओएस मर्चंट अक्वायरर’ आहे. कार्ड्स, वॉलेट्स, मोबाइल पेमेंट अ‍ॅप्स आणि बँक अ‍ॅप्स, तसेच कॉन्टॅक्टलेस व क्यूआर पेमेंट्स या पेमेंट करण्याच्या विविध प्रकारांसाठी ‘एमस्वाईप’ कंपनी सोल्युशन्स देते. मुंबईत मुख्यालय असलेल्या ‘एमस्वाईप’ने २०११ मध्ये कामकाज सुरू केले. या कंपनीच्या मुख्य गुंतवणूकदारांमध्ये बी कॅपिटल, यूसी-आरएनटी, फाल्कन एज कॅपिटल, मॅट्रिक्स पार्टनर्स इंडिया, डीएसजी पार्टनर्स आणि एपिक कॅपिटल यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी https://www.mswipe.com ही वेबसाईट पाहा.
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@