कोरोना लस प्रत्येकाला परवडणार! किंमत जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2020
Total Views |

SII _1  H x W:





पुणे : जगभर थैमान घातलेल्या कोरोनाची लस किती रुपये असेल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. याच दरम्यान पुण्यातील सिरम इन्स्टीट्युटने कोरोना लसीची किंमत जाहीर केली आहे. हा दर सर्वसामान्यांना परवडणारा असेल तसेच कोरोनाची लस प्रत्येकाला उपलब्ध करून देता येईल, असे या संस्थेचे लक्ष्य आहे. कोरोना लसीची एकूण किंमत तीन डॉलर म्हणजे दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत असणार आहे. सिरम इन्स्टीट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष लस उत्पादन करणार आहे. 

 
 


सिरम इन्स्टिटयुटने जगभरात साऱ्यांना परवडावी यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठासह लसीची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेस्ट्स, बिल अँड मिलिंडा गेस्ट फाऊंडेशन, GAVI या संस्थेचे त्यांनी आभार मानले आहेत. या लसीची निर्मिती GAVIतर्फे केले जाणार आहे. बिल गेस्ट फाऊंडेशनतर्फे या लसीच्या निर्मितीसाठी १५० दशलक्ष डॉलर्सची मदत केली आहे. भारतात एकूण १०० दशलक्ष लसीचे उत्पादन करण्याचे लक्ष्य़ ठेवण्यात आले आहे.



@@AUTHORINFO_V1@@