सीबीआयकडून रियासह सहा जणांविरुद्ध गुन्हा!

07 Aug 2020 13:05:28
sushant_1  H x


सुशांत आत्महत्येप्रकरणी सीबीआय तपासाला वेग!


मुंबई :
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारच्या शिफारसीनंतर केंद्राने सीबीआयकडे सुपूर्द केले आहे. त्यानुसार केंद्राने अधिसूचना काढल्यानंतर सीबीआयने अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्तीसह तिचा भाऊ शोविक, आई संध्या चक्रवर्ती, वडील इंद्रजित, शमुवेल मिरांडा आणि श्रुती मोदी यांचा समावेश आहे. या ६ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, गुन्हेगारी षडयंत्र रचणे, चोरी-फसवणूक आणि धमकी यासारखे गुन्हे नोंदवण्यात आले आहे.


सीबीआयने बिहार पोलिसांशी संपर्क साधून आतापर्यंतच्या तपासाची कागदपत्रे मागितली आहेत. सीबीआयचे विशेष पथक सुशांतच्या मृत्यूची चौकशी करणार आहे. यात डीआयजी मनोज शशिधर आणि एसपी नुपूर प्रसाद यांचा सहभाग असेल. शनिवारी सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी असून मुंबई पोलिस सुशांत सिंह प्रकरणाचा तपास अहवाल कोर्टात सादर करणार आहेत. मात्र, आता मुंबई पोलिस या प्रकरणी काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.





Powered By Sangraha 9.0