एकनाथ खडसेंनाही महावितरणचा शॉक ; लाखांच्या घरात वीजबिल

07 Aug 2020 14:48:52

eknath khadse_1 &nbs



मुंबई :
महावितरणने एक लाखाचे वीज बिल पाठवल्याने एकनाथ खडसे संतापले असून नागरिकांना येणाऱ्या भरमसाठ वीज बिलावर तोडगा काढण्यासाठी राज्यसरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.कोरोना व्हायरसच्या संकटात महाविरणनं भरीव वीज बिल पाठवून सामान्यांना झटकाच दिला. अव्वाच्या सव्वा वीज बिलाचा फटका केवळ सामान्यांनाच नव्हे, तर विविध क्षेत्रातील सेलिब्रेटिंनाही बसला आहे. आता या वाढीव बिलाच्या यादीत राजकीय नावाचा सहभाग झाला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवून महावितरणने खडसेंना शॉक दिला आहे.


एकनाथ खडसे यांचे मुक्ताईनगरमध्ये घर आहे. महावितरणने खडसेंना एप्रिल ते जुलै या महिन्याचे वीजबिल तब्बल १ लाख ४ हजार इतके पाठविण्यात आले आहे.इतक्या प्रचंड प्रमाणात बिल आल्याने खडसे चांगलेच भडकले आहे.ते म्हणाले,'' महावितरणने मला प्रचंड बिल पाठवलं आहे. सर्वसामान्य लोकांनाही अव्वाच्या सव्वा बिल पाठवलं आहे. महावितरणने भरमसाठ बिल पाठवून सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे. राज्य सरकारने याप्रकरणात ग्राहकांना सवलत द्यावी.''
Powered By Sangraha 9.0