दुर्दैवी २०२० : एअर इंडियाच्या विमानाला कोझिकोडमध्ये भीषण अपघात...

07 Aug 2020 21:40:02

Keral_1  H x W:
 
 
केरळ : शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाला केरळमध्ये अपघात झाला आहे. एअरपोर्टवर लँडिंग करत असताना विमानाला अपघात झाला असून अपघातावेळी विमानात १९१हुन अधिक प्रवासी प्रवास करत होते. अद्याप एअर इंडियाने याबाबत कुठलीही माहिती जाहीर केली नसली तरीही यामध्ये वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याव्यतिरिक्त या अपघातातील जीवितहानी अद्याप कळू शकलेली नाही.
 
 
विमानाच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असून या अपघाताची तीव्रता लक्षात येते. केंद्रीय हवाई वाहतूक संचलनालयाने या विमानात १९१ प्रवासी होत असेही स्पष्ट केले. या भीषण अपघातात विमानाचे दोन तुकडे झाल्याचे छायाचित्रांमध्ये दिसून येत आहे. या अपघातानंतर २०२० हे वर्ष मात्र दुर्दैवी ठरत असल्याची भावना सोशल मिडीयावर व्यक्त होत आहे.
 
(सविस्तर वृत्त लवकरच)
Powered By Sangraha 9.0