'काश्मीर भारताचे नंदनवन ; हेतू इथल्या विकासाला चालना देणे'

07 Aug 2020 17:40:18

manoj sinha_1  



श्रीनगर :
मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरचे दुसरे उपराज्यपाल म्हणून शपथ घेतली. राज्यपाल म्हणाले की काश्मीर हे भारताचे नंदनवन आहे. मला इथे भूमिका साकारण्याची संधी देण्यात आली आहे. ५ ऑगस्ट ही महत्वाची तारीख आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीर मुख्य प्रवाहात आला आहे. बऱ्याच वर्षांनी इथे नवीन प्रकल्प सुरू झाले आहेत. त्या प्रकल्पांना पुढे नेणे ही माझी प्राथमिकता आहे.



उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, घटनात्मक अधिकारांचा उपयोग कोणताही पक्षपात न करता लोकांच्या हितासाठी केला जाईल. मी लोकांना आश्वासन देतो की त्यांच्या तक्रारी ऐकल्या जातील आणि आम्ही त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. ते म्हणाले की आमचा हेतू इथल्या विकासाला पुढे आणणे आहे.



आज सर्व प्रशासकीय सचिवांची बैठकही बोलविण्यात आली होती. ही बैठक सचिवालयात संध्याकाळी तीन वाजता झाली. यात उपराज्यपाल मनोज सिन्हा रोड मॅपचा खुलासा करतील. या बैठकीसंदर्भात जीएडीने जारी केलेल्या आदेशात सर्व प्रशासकीय सचिवांनी वेळेवर हजर राहावे, असे म्हटले आहे. असा विश्वास आहे की ते सभेत सर्वांसमोर विकासाची दूरदृष्टी ठेवतील. प्रशासन कसे चालवायचे आणि प्राधान्यक्रम काय असतील याची रूपरेषा ते मांडतील.
Powered By Sangraha 9.0