रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर : वाचा किती असणार व्याजदर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Aug-2020
Total Views |
Shaktikant Das _1 &n




मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सहा सदस्यीय समितीची बैठक नुकतिच पार पडली. या बैठकीत पतधोरण आढावा जाहीर केला. तीन दिवस सुरू असलेल्या बैठकीत रेपो दरात कुठलेही बदल झाला नाही. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. हा रेपो रेट दर ४ टक्के इतका ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. यामुळे कर्जाच्या हप्त्यांमध्ये कुठलाही बदल होणार नाही.
 
 

 
 
 
शक्तीकांत दास म्हणाले, "आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहारांवर कोरोना आणि लॉकडाऊनचे पडसाद उमटले आहेत. कोरोनाचा अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे. आर्थिक परिस्थितींमध्ये सुधारणा होण्यास सुरूवात झाली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन लावणे भाग पडले. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी कंपन्या, व्यक्तिगत कर्जदारांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याची सुविधा दिली. रेपो रेट आहे तेवढाच म्हणजे ४ टक्के ठेवण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेट सुद्धा ३.३५ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@