मनोज सिन्हा जम्मू-काश्मीरचे नवनियुक्त उपराज्यपाल

    दिनांक  06-Aug-2020 11:42:19
|

manoj sinha_1  नवी दिल्ली :
भाजप नेते व माजी मंत्री मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून कामकाज पाहणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला आहे, त्यानंतर मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मीरचे नवीन उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्‍मीरमधून कलम ३७० हटवण्याला एक वर्ष पूर्ण झाले. मूर्मू यांनी ३१ ऑक्‍टोबर २०१९ रोजी जम्मू काश्‍मीरच्या उपराज्यपालपदाची शपथ घेतली होती. मुर्मू यांनी कार्यकाळात काश्‍मीर शांतता, स्थिरता आणि विकास या त्रिसूत्रीवर यशस्वी कामकाज पहिले. तसेच राज्यात दहशतवाद आणि दगडफेकीसारख्या घटनांमध्येही घट झाली आहे. बुधवारी संध्याकाळी गिरीष चंद्र मूर्मू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा हे माजी आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी अर्थ आणि गृह व्यवहार मंत्रालयात सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.