सुशांतची एक्स-मॅनेजर दिशाची केस सीबीआयकडे सोपवण्याची मागणी!

06 Aug 2020 16:11:27
Disha_1  H x W:

दिशाच्या शरीरावर जखमा आढळल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात निष्पन्न!

मुंबई : बिहार सरकारच्या शिफारसीनुसार केंद्राने आता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपविली आहे. आता सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. त्याचबरोबर या मागणीसंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियनने ८ जून रोजी मुंबईच्या मलाड येथील इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर, १४ जून रोजी सुशांतने स्वत: च्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.


या प्रकरणात, भाजप खासदार नारायण राणे यांनी दिशाचीदेखील हत्याझाल्याचा दावा केला आहे. दिशाच्या पोस्टमॉर्टम अहवालानुसार तिच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. याशिवाय तिच्या खाजगी अवयवांना देखील इजा झाली आहे. यावरूनच दिशाची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला असावा, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.


भाजप प्रवक्ते गौरव गोयल यांनी देखील दिशाची हत्या झाल्याचे म्हंटले आहे.








Powered By Sangraha 9.0