घरात बसून मोबाईल गेम खेळणाऱ्यांचा तर सल्ला नाही ?

06 Aug 2020 13:55:56



ashish shelar_1 &nbs


मुंबई :
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास डिजिटली करण्याचा सल्ला मुंबई महापालिकेने बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना दिल्यामुळे भाजप नेत्यांनी राज्यसरकारवर टीकेची तोफ डागली. 'घरात बसून मोबाइल गेम खेळणाऱ्यांचा हा सल्ला नाही ना,' असा खोचक टोला भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हाणला आहे.





सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेकडून क्वारंटाइन करण्यात आल्यामुळे भाजप अधिकच आक्रमक झाला आहे. विनय तिवारी यांना तपासासाठी क्वारंटाइनच्या नियमातून सवलत देण्यात यावी असे पत्र देखील बिहार पोलिसांनी मुंबई महापालिकेला (BMC) लिहिले होते. त्यावर उत्तर देताना तिवारी यांनी तपासासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करावा, असा सल्ला महापालिकेने बिहार पोलिसांना दिला आहे. त्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर आमदार आशिष शेलार यांनी टीका केली. या संदर्भात ट्विट करत ते म्हणतात, 'व्हर्च्युअल राज्य सरकार व व्हर्च्युअल मुंबई पालिकेने जसे रस्त्यावरील खड्डे व्हर्च्युअली भरले, नाल्यातील गाळ व्हर्च्युअली काढला. त्याचप्रमाणे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास क्वारंटाइन विनय तिवारी यांनी व्हर्च्युअलीच करावा, अशी अपेक्षा आहे का ? घरात बसून मोबाइल गेम खेळणाऱ्यांनी तर हा सल्ला दिला नाही ना,' अशी खोचक टोलाही शेलार यांनी लगावला आहे.
Powered By Sangraha 9.0