मिस इंडिया ते थेट यूपीएससी; तरुणीचे होतेय कौतुक!

06 Aug 2020 15:55:20
Aishwarya_1  H


‘मिस इंडिया’या सौंदर्य स्पर्धेत अंतिम टप्प्यापर्यंत पोहचलेल्या ऐश्वर्याने यूपीएससीमध्ये पटकावली ९३वी रँक!



नवी दिल्ली : मंगळवारी लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत एकूण २३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यातील ८२९ विद्यार्थी अंतिम मुलाखतीसाठी निवडले गेले. यातील ऐश्वर्या श्योराण हे नाव चर्चेत आले आहे. ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेत अंतिम टप्प्यापर्यंत पोहचलेल्या ऐश्वर्याने यूपीएससीमध्ये ९३ वी रँक पटकावली आहे.


सामाज माध्यमांवर ऐश्वर्याचे जोरदार कौतुक होत आहे. तिच्या चाहत्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल तिचे भरभरून कौतुक केले आहे. ऐश्वर्या श्योराण ही प्रसिद्ध मॉडेल आहे. ऐश्वर्या श्योराण, फेमिना मिस इंडिया २०१६ ची अंतिम स्पर्धेतील स्पर्धक, कॅम्पस प्रिन्सेस दिल्ली २०१६, फ्रेशफेस विनर दिल्ली २०१५ मधील विविध स्पर्धांबद्दल तसेच यूपीएससीमध्ये भारतात ९३ वी रँक मिळवल्याबद्दल आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतोय. हे यश संपादन केल्याबद्दल तुझे मनःपुर्वक अभिनंदन..!’, असे म्हणत मिस इंडियाच्या अधिकृत ट्विटरवरूनदेखील तिचे अभिनंदन करण्यात आले आहे. 







माजी मिस वर्ल्ड व अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या नावावरून ऐश्वर्याचे नाव ठेवण्यात आले होते. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणे, हे ऐश्वर्याचे स्वप्न होते. ऐश्वर्याचे वडील कर्नल अजय कुमार हे एनसीसी तेलंगणा बटालियनचे लष्करी अधिकारी आहेत.









Powered By Sangraha 9.0