रामकुंडावर महाआरती करण्यास मनाई ; पोलीसांकडून नोटीस

05 Aug 2020 11:59:03
 

nashik_1  H x W 
 
 
नाशिक : अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर देशभरात खबरदारी घेतली जात आहे. नाशिकमध्ये मंदिरे खुली करा, अशी मागणी करणाऱ्या साधू, संत, महंत, पुरोहित यांना कलम १४९ ची नोटीस बजावण्यात आली. बुधवारी खबरदारी म्हणून साधू, संत, महंत, पुरोहित यांना कलम १४९ची नोटीस बजावण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
 
 
शहरातील रामकुंड, गोदा घाट येथील राम स्तंभ अभिषेक, पूजा अर्चा, गोदानदी पूजन अर्थात महाआरती करण्यास मनाई करण्यात आली आहे. रामकुंडामध्ये कोणत्याही प्रकारची पूजा केल्यास गुन्हे दाखल करणार, असा इशारा देत मध्यरात्रीच नाशिक पोलिसांनी शहरातील सर्व साधू, महंत, पुरोहित यांना नोटीस बजावली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील मंदिरे खुली करा अशी मागणी हिंदूत्वावादी संघटनांनी केली होती. पण, राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता आणि कलम १४४ लागू असल्याने जिल्ह्याधिकाऱ्यांनी परवानगी देण्यास नकार दिला होता.
 
 
विशेष म्हणजे, आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी महाआरती करणारच असा पवित्रा सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला होता. पण, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता पोलिसांनी सर्व मंहत आणि पुरोहितांना गर्दी न करण्याची विनंती केली आहे.
Powered By Sangraha 9.0