हा मुहूर्त अशुभ ; देवा आम्हाला माफ कर : दिग्विजय सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |

digvijay sing_1 &nbs
अयोध्या : आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन विधिवत पार पडणार आहे. देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. परंतु, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह हे भूमिपूजनाच्या मुहूर्तला अशुभ म्हणून संबोधत आहेत. गेल्या पाच दिवसांत दिग्विजय यांनी या विषयावर ट्विट केले होते. बुधवारी भूमिपूजनापूर्वी त्यांनी ट्वीट केले आणि म्हटले, “आज, अयोध्यामधील भगवान रामललाच्या मंदिराचा शिलान्यास वेदांनी स्थापित केलेल्या ज्योतिषाच्या प्रस्थापित मान्यतेच्या विरोधात आहे, हे देवा आम्हाला माफ करा. हे बांधकाम निर्विघ्न पार पडू दे. आपणास ही आमची प्रार्थना आहे. जय सियाराम." यापूर्वीही सोमवारी दिग्विजय सिंग यांनी भूमिपूजन सोहळ्याला कोरोनाशी जोडले होते. त्यांनी ट्वीट केले होते, 'राम मंदिर भूमीपूजेसाठी हिंदू धर्माच्या मान्यतांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. म्हणूनच गृहमंत्री अमित शहापासून ते राम मंदिराच्या पुजारीपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एका ट्विटमध्ये दिग्विजय यांनी अमित शहा यांना पंतप्रधान म्हणून लिहिले. नंतर खंतही व्यक्त केली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@