सुशांत केस बिहार पोलिसांच्या अखत्यारीत येत नाही : सतीश मानेशिंदे

04 Aug 2020 14:36:14
SSR_1  H x W: 0

तपास सीबीआयकडे सोपवण्यावर रियाच्या वकिलाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित!


मुंबई : अलीकडेच सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात बिहारमधील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यानंतर रियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. रियाने आपल्या याचिकेत बिहारमध्येदाखल केलेला खटला मुंबईकमध्ये हस्तांतरित करावा अशी मागणी केली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुनावणी बाकी आहे. आता रियाचे वकील सतीश यांनी सीबीआय तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.


बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची शिफारस केल्यावर रियाच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वकिलांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नसून, बिहार पोलिसांनी सामील होण्याचे कोणतेही आधार नसल्याने हे प्रकरण सीबीआयकडे पाठवण्याची शिफारस त्यांना करता येणार नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.


रियाचे वकील म्हणाले, ‘रियाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात असे म्हटले होते, की या प्रकरणाची चौकशी बिहार पोलिसांच्या अखत्यारीत येत नाही, ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सुरू राहणार आहे. बिहार पोलिसांना या प्रकरणात सामील होण्याचे कोणतेही कायदेशीर आधार नाहीत. बिहार पोलिसांकडे या खटल्याचे अन्वेषण करण्याचा अधिकार नाही, म्हणून त्यांनी चुकीच्या पद्धतीने तपास केला. असे करून, ते आपल्या देशाच्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये पूर्वगामी हस्तक्षेप करीत आहेत.’ असे ते म्हणाले.


सुशांतच्या वडिलांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी बोलून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर सीएम नितीश यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे पाठविली आहे. आज त्याविषयी बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश म्हणाले, ‘मी सुशांतसिंग राजपूत यांच्या वडिलांशी बोललो. त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यांच्या मागणीच्या आधारे बिहार सरकार सीबीआय चौकशीची शिफारस करेल. सायंकाळपर्यंत सर्व कागदी कारवाई पूर्ण केली जाईल.’
Powered By Sangraha 9.0