मुसळधार पावसामुळे मुंबईची पुन्हा झाली 'तुंबई'!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |

water logging_1 &nbs



मुंबईसह उपनगरात मागील १० तासांत २३० मिमी पावसाची नोंद!


मुंबई : मुंबईसह उपनगरात मागील १० तासांत २३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारीसुद्धा सकाळपासुन पावसाने चांगलाच जोर धरलाय, यामुळे कुर्ला – नेहरूनगर, भायखळा, गोरेगाव, किंग सर्कल, करी रोड, कांदिवली, चारकोप परिसरातील सखल भागात पाणी भरल्याचे पाहायला मिळत आहे. गोरेगावमध्ये मोतीलाल नगरात रहिवाशांच्या घरात पाणी शिरले आहे. तर, समता नगर पोलिस स्थानकाजवळ भुस्सखलन झाले आहे. सोमवारी रात्रीपासुन सुरु झालेला हा पाऊस आणखीन ४८ तास कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.







तर, मुंबईसह उपनगरात आणि उद्या अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत जाणे नागरिकाने टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.







भारतीय हवामान विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे. तसेच पालिकेने काही यंत्रणाही तैनात केल्या आहेत. अतिवृष्टीचा अंदाज पाहता आपत्कालीन सेवा वगळता सर्व कार्यालये व अन्य आस्थापने आज बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.








@@AUTHORINFO_V1@@