कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दहा दिवसांचे क्वारंटाईन बंधनकारक

04 Aug 2020 17:16:06

kokan_1  H x W:


मुंबई:
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना १० दिवस होम क्वारंटिन व्हावे लागणार आहे. १२ ऑगस्टच्या आधी कोकणात जाणाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल. तर त्यानंतर कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांना स्वॅब चाचणी बंधनकारक असेल. असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. क्वारंटाईन बंधनकारक केल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



खासगी वाहनांनी कोकणात जाणाऱ्यांना ई-पास काढावा लागेल. एसटीने जाणाऱ्यांना ई-पासची गरज भासणार नाही. एसटी हाच त्या प्रवाशांसाठी ई-पास असेल अशी माहिती अनिल परब यांनी दिली. २२ जणांनी मिळून एसटीचे ग्रुप बुकिंग केल्यास प्रवाशांना एसटी थेट त्यांच्या गावात सोडेल. त्यांना जेवण एसटीमध्येच करावे लागेल, असेही परब यांनी सांगितले. तसेच, खासगी बसेसला एसटी पेक्षा दीडपट पैसे घेण्याचा अधिकार आहे, त्याशिवाय कोणी मागणी केली तर लोकांनी पैसे देऊ नये. कोणी अधिकचे पैसे आकारले तर कारवाई करणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. दरवर्षी २२०० गाड्या जातात यंदाच्या वर्षी ३ हजार गाड्याची तयारी ठेवली आहे. १२ तारखेपर्यंत जे जाणार त्यांना घरीच क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे,असेही त्यानीं सांगितले.



Powered By Sangraha 9.0