पाकिस्तान दहशतवादाचे मुख्य केंद्र ; संयुक्त राष्ट्रांत भारताचे वक्तव्य

04 Aug 2020 13:49:50

T S tirumurti_1 &nbs
संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांना थारा देण्यावरून लक्ष केले. पाकिस्तान दहशतवादाचे मुख्य केंद्र असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या सहभागाचा पुनरुच्चार करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाचा हवाला दिला. ते म्हणाले की, अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवाद्यांची उपस्थिती आहे जे वारंवार तेथे दहशतवादी हल्ले घडवून आणतात.
टी.एस. तिरुमूर्ती म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र आहे हे सर्वज्ञात सत्य आहे. पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असणाऱ्या दहशतवादी संस्था जमात-उद-दावा, लष्कर-ए-तैयबा, जेईएम आणि हिजबुल मुजाहिद्दीन आणि व्यक्ती यांचे सर्वात मोठे घर आहे. यूएनच्या अनॅलिटीक सपोर्ट अँड सॅंक्शन मॉनिटरिंग पथकाच्या २६ व्या अहवालाचा हवाला देत ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या अहवालात विदेशातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या सहभागाचा पुनरुच्चार केला आहे. अलिकडच्या अहवालात, आयएसआयएल, अल कायदाच्या दहशतवादी कारवायांविषयी ठराविक काळाने आपला अहवाल सादर करणारी विश्लेषक सहाय्यता आणि मंजुरी मॉनिटरींग टीमला त्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचा थेट संदर्भ सापडला आहे.
Powered By Sangraha 9.0