राज्यात भूमीपूजन उत्सव साजरा करणाऱ्या भाजप नेत्यांना नोटीस

04 Aug 2020 19:42:45
ram mandir _1  





मुंबई :
अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी घरीच सुरक्षित राहत, घरासमोरील अंगणात दीप लावत, ध्वज फडकावत हा सोहळा साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, राज्यात भूमीपूजन उत्सव साजरा करणाऱ्या भाजप नेत्यांना पोलिसांकडून नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीशीनुसार जल्लोषवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत.
 

उद्या अयोध्यामध्ये राम मंदिराचे भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमामुळे अनेकांमध्ये उत्साह असून यानिमित्ताने जल्लोष करण्याचे नियोजनही भाजपसह अनेक संघटनांनी केले आहे. तर काहींनी फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद साजरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात सांगली जिल्ह्यातील विटा पोलिसांकडून भाजप शहराध्यक्ष अनिल बाबर यांना नोटीस वाजविण्यात आली आहे.



सदर नोटिशीत म्हणले आहे की, अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम वेळेस आपण व आपले कार्यकर्ते समर्थक किंवा आपल्या भागात कोणीही कुठल्याही प्रकारचे जल्लोष , विजय मिरवणूक , फटाक्यांची आताषबाजी, घोषणाबाजी , शुभेच्छा फ्लेक्स बोर्ड लावणे या व्यतिरिक्त भूमिपूजनाच्या अनुषंगाने सोशल मीडिया वर होम हवन, सामूहिक पूजा, नमाज पठण व त्यासंबंधित सोशल मीडियावर विशिष्ट फोटो अथवा मजकूर शेअर करू नये व दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा स्वरूपाची कुठलेही कृत्य करू नये. तसे केल्यास कार्यकर्त्यांवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचे गुन्हे दाखल करण्यात येतील. जर नोटिशीमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही व त्यातून काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,' असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.






 
 
 
Powered By Sangraha 9.0