प्रवीण परदेशी यांच्याकडे आता आंतरराष्ट्रीय जबाबदारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Aug-2020
Total Views |

BMC_1  H x W: 0
 
 
मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्याय मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळणारे अधिकारी म्हणून ओळख असणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्वाची जबाबदारी सांभाळताना पहायला मिळणार आहे.
 
 
मे महिन्यात ऐन कोरोना संकटात मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये नगरविकास विभागात मुख्य अतिरिक्त सचिव पदावर बदली करण्यात आलेले प्रवीण परदेशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या (युएनआयटीएआर) जागतिक समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या परदेशी यांची कोरोना काळात राज्य सरकारने मुंबई महापालिका आयुक्तपदावरून नगरविकास विभागात मुख्य अतिरिक्त सचिव पदावर बदली केली त्या परदेशींची आता जागतिक स्तरावरील विविध आजारांवर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने महत्वाच्या पदी नियुक्ती केली आहे. विविध साथींच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रवीण परदेशी हे संयुक्त राष्ट्रसंघाचे ‘ग्लोबल प्रोग्राम कोऑर्डिनेटर’ म्हणून काम करतील. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या (युएनआयटीएआर) जागतिक समन्वयकपदी त्यांची नियुक्ती करयात आली आहे. एकूण ११ महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ असेल.
 
 
@@AUTHORINFO_V1@@