सुबोध भावेसह कुटूंबियांना कोरोनाची लागण

    दिनांक  31-Aug-2020 14:53:13
|
Subodh Bhave _1 &nbs
 
 
मुंबई : अभिनेता सुबोध भावे, त्याची पत्नी आणि मुले या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. फेसबूक पोस्टद्वारे त्याने ही माहिती जाहीर केली असून घरातच क्वारंटाईन राहणार असल्याचे त्याने सांगितले आहे. सुबोध आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, "मी, मंजिरी (पत्नी) आणि मोठा मुलगा कान्हा या तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आम्ही उपचार घेत आहोत., तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया." कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर घरातूनच उपचार घेणार असल्याचे सुबोधने सांगितले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.