प्रशांत भूषण दोषी : निकालानंतर केले 'हे' ट्विट

31 Aug 2020 16:15:11

Prashant Bhushan_1 &
 



नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यावर न्यायालयाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. निकाल लागल्यानंतर काही क्षणातच भूषण यांनी एक ट्विट केले. त्यांचे सहकारी आणि वकील राजीव धवन यांना भूषण यांनी एक रुपयांची दंडाची रक्कम सोपवली. या बद्दलचे ट्विट केलेल्यानंतर पुन्हा प्रशांत भूषण यांच्यावर टीका केली जात आहे.
 
 
 
आत्तापर्यंत आपल्या वक्तव्यावर ठाम राहणाऱ्या भूषण यांनी अखेर आपली चूक कबूल करत दंडाची रक्कम देण्यास तयारीही दर्शवली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ही रक्कम जमा न केल्यास त्यांना तीन महिन्यांची कैद होऊ शकते शिवाय तीन वर्षे वकीलीही थांबवली जाऊ शकते.
 
 
 
सर्वोच्च न्यायालयाने १४ ऑगस्ट रोजी न्यायालय अवमान प्रकरणी भूषण यांना दोषी ठरवले होते. भूषण यांच्या ट्विटमध्ये लावण्यात आलेले आरोप दूर्भाग्यपूर्ण आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अवमानना यामध्ये एक बारीक रेषा असते. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटले होते की, "प्रथमदर्शनी ट्विट हे न्यायपालिकेचा अवमान करणारे ठरते आहे, सर्वोच्च न्यायाधीश हे पद जनतेत सन्मानाने पाहिले जाते. त्यांच्या या विधानामुळे त्याला ठेच पोहोचू शकते."
 
 
 
बऱ्याच ठिकाणी प्रशांत भूषण यांच्या समर्थनात एक मोठा वर्ग उतरला होता. कित्येक वकीलांनीही याबद्दल समर्थन दाखवले होते. मात्र, न्यायालयाने भूषण यांना दोषी ठरवत आज शिक्षा सुनावली. प्रशांत भूषण यांनी न्यायमूर्ती बोबडे यांच्यावरही टीपण्णी केली होती.



 
Powered By Sangraha 9.0