९९ टक्के फिल्मस्टार घेतात ड्रग्ज; पार्टीत पाण्यासारखा उधळतात पैसा!

    दिनांक  30-Aug-2020 17:07:36
|
99 per cent filmstars tak
 
 
 
 
मुंबई : सुशांत सिंह प्रकरणात ड्रग्ज अँगल उघड झाल्यानंतर आता धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजल्यापासून चौकशी सुरू आहे. अशातच कंगना रणौत हिने बॉलीवुडचा काळ्या चेहरा जगासमोर आणला आहे. पार्ट्यांमध्ये पाण्यासारखे ड्रग्ज वापरले जातात. नव्याने बॉलीवुडमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला ड्रग्ज देण्याचे काम काही मंडळी करत असतात, असा आरोप कंगनाने केला आहे. एखाद्याला ड्रग्ज देऊन त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकारही घडतो, असा आरोपही तिने केला आहे.
 
 
 
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणौत हिने बॉलीवुड कलाकारांमध्ये होत असलेल्या ड्रग्जच्या वापराबद्दल नवा खुलासा केला आहे. ९९ टक्के स्टार्स ड्रग्ज घेतात, ड्रग्ज डिलर्सही यांच्यापैकीच असतात, एलएसडी, एक्टेसी आदी ड्रग्जचा पुरवठा करतात, असा आरोप 'रिपब्लिक टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप केले आहेत. सर्व गोष्टी पद्धतशीर नियोजनपूर्ण असतात, असेही ती म्हणाली.
 
 
 
कंगना म्हणते, "अभिनेत्यांच्या पत्नी अशाप्रकारच्या पार्ट्या आयोजित करतात. तिथे संपूर्णपणे वेगळाच माहोल असतो. या पार्टीत तुम्हाला उधळपट्टी करणारे आणि नशाबाज लोकच मिळतील. बॉलीवुड ड्रग्ज माफियांना पुढे जाण्यासाठी व्यवस्थेतील कित्येक जणांनी मदत केली आहे. हे लोक एकमेकांना सांभाळून अशी कामे करतात पुढे दिग्दर्शक बनतात, किंवा अभिनेता बनतात. मी अशा ठिकाणी गेले आहे, तिथे गेल्यानंतर हे लोक फक्त आणि फक्त ड्रग्ज घेणे सुरू करायचे.
 
 
 
ती पुढे म्हणते, "या सगळ्या गोष्टी एका ड्रिक्सद्वारे सुरू होतात. एक रोल, एक गोळी त्यानंतर ड्रग्ज दिले जाते. या सर्व गोष्टी गोपनीय असतात. यात कलाकारांच्या पत्नी ड्रग्ज घेतातही आणि दुसऱ्यांना त्याचे व्यसन लावतात. ही अशी एक वाईट सवय आहे ज्याचा सर्वसामान्य विचारही करू शकत नाही. ड्रग्ज पार्ट्या कधीकधी हाताबाहेर जातानाही मी पाहिल्या आहेत. पोलीसांना या गोष्टी माहिती असतात. मात्र, पद्धतशीरपणे या गोष्टींकडे डोळेझाक केली जाते. काही अभिनेता राजकारण्यांसाठी प्रचार करत असतात. याच कनेक्शनमुळे अनेकजण बऱ्याचदा सहज सुटून येतात. कंगना रणौतने बॉलीवुडमध्ये ड्रग्जचे विष पेरणारे लोक हे पब मालक किंवा रेस्ट्रोरंटचे मालक असतात, असेही म्हटले.
 
 
 
कंगना म्हणते, "मी जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला त्यावेळी एका काम देणाऱ्या कॅरेक्टर आर्टीस्ट व्यक्तीने ड्रग्ज दिले होते. चंदीगडमध्ये एक स्पर्धा जिंकल्यावर एका जाहीरातीसाठी निवड झाली होती. त्यानेच मुंबईत पाठवण्याची व्यवस्थाही केली. मुंबईत आल्यानंतर कामाच्या शोधात एका महिलेसोबत राहत होती. या दरम्यान, त्या व्यक्तीने कंगनावर अधिकार गाजवण्यास सुरुवात केली. तिला ड्रग्ज देऊन नशेच्या आहारी नेण्यास सुरुवात केली. कॅरेक्टर आर्टीस्टने तिला मारहाण करण्यासही सुरुवात केली होती. कंगनावर जास्त परिणाम होत नसल्याचे पाहून त्याने एका खोलीत बंद करून ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
 
 
 
संबंधित कॅरेक्टर आर्टीस्ट कंगनाला स्वतःची मालकी समजू लागला होता. मात्र, ज्यावेळी कंगनाला एका बड्या चित्रपटाची ऑफर मिळाली त्यावेळी कंगनाला त्याने ड्रग्ज देणे सुरुवात केली. ड्रग्ज देऊन एका बंद खोलीत ठेवण्यास सुरुवात केली होती. मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी कंगनाने पोलीसांत एफआयआर दाखल केली होती. कंगना शुटींगला जाऊ नये म्हणून तो व्यक्ती कंगाला इंजेक्शन देत असल्याचा खळबळजनक आरोपही कंगनाने केली होती.
 
 
कंगनाने एका घटनेचाही उल्लेख केला, त्यात एक बॉलीवुड स्टारची परदेशात शुटींग होती. त्यात लास वेगास येथे एक छोटी भूमिका निभावली होती. या दरम्यानच ड्रग्ज माफियाशी जवळून संबंध आला होता. सिने अभिनेत्याची पत्नी खुलेआम ड्रग्ज विकत होती.त्यानंतर कंगना या बड्या स्टारशी संबंधातही आली होती. त्यावेळी ओव्हरडोसमुळे त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. त्या स्टारने आणि त्यांच्या कुटूंबाने कंगनाला ड्रग्जच्या दुनियेत ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला.
 
 
 
बाहेरून येणाऱ्यांचे वारंवार शोषण केले जाते. बॉलीवुडमध्ये येणाऱ्यांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल कुठलीही कायदेव्यवस्था नाही. पोलीसांकडे जाणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते, असेही ती म्हणाली. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कंगना मनालीतील घरीच आहे. माझ्यासाठी आता करो या मरो, अशी अवस्था झाली असून जर आत्ता मी शांत बसले तर माझे शत्रू मलाच संपवतील, अशी भीतीही तिने व्यक्त केली. त्यामुळे मी थांबणार नाही, लढाई लढेन, असेही तिने सांगितले.
 
 
 
बॉलीवुड आणि ब्रँण्डसना हिंदू-विरोध, राष्ट्रविरोधी भूमीका घेणाऱ्यांनाही कंगनाने फटकारले आहे. कुठलेही अभिनेता, सेलिब्रिटी राष्ट्रवाद किंवा धर्माची बाजू घेऊन बोलू शकत नाहीत. जर त्यांनी तसे केले तर त्यांना जाहीराती मिळणे बंद होतात. बॉलीवुडने आत्तापर्यंत तीन तलाक आमि निकाह हलाल या विषयांवर चित्रपट का केले नाहीत, असाही प्रश्न विचारला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.