नक्षलवादी भावाची आत्मसर्पण करत बहिणीला ओवाळणी

03 Aug 2020 18:01:54
Rakshabandhan_1 &nbs
 
 
नवी दिल्ली : नक्षलवादी भावाने बहिणीच्या आग्रहाखातर मार्ग बदलून आत्मसमर्पण केले आहे. त्याने नव्या आयुष्याची सुरुवात करत बहिणीला अनोखी ओवाळणी दिली आहे. मल्ला, असे त्याचे नाव असून तो छत्तीसगडच्या दंतेवाडा भागात तो सक्रीय होता. एका बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी अशी अनोखी ओवाळणी मिळण्याच्या या क्षणामुळे कुटूंबातील सारेजण भावूक झाले आहेत. नक्षलाने बहिणीच्या भावूक आवाहनानंतर नक्षलवादाचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले. छत्तीसगडच्या नक्षली प्रभाव असलेला दंतेवाडा जिल्ह्यतील ही घटना आहे. 


पोलिसांना शरण येऊन त्याने आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतली. त्याच्या बहिणीने परत नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचे आवाहन त्याला केले होते. बहिणीचा सल्ला ऐकून परत आलेल्या भावाला पाहून बहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. मल्लावर अनेक कारस्थाने आणि बाँम्बस्फोटांना जबाबदार असल्याचा आरोप आहे. त्याच्यावर आठ लाखांचे बक्षीस आहे. मल्ला हा नक्षली कमांडर होता. २३ जुलै रोजी मल्लाच्या बहिणीने त्याला नक्षलवादाचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. ती म्हणाली होती की, दादा, मी तू नक्षलवादाचा मार्ग सोडून घरी परत ये अनेक वर्षापासून माझ्या भावाच्या हातावर मला राखी बांधता आली नाही. या वर्षी तरी हे भाग्य मला दे, असे भावूक आवाहन तिने केले होते.


Powered By Sangraha 9.0