सुशांत सिंह प्रकरणात कुठलीही संशयास्पद माहिती नाही : मुंबई पोलीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Aug-2020
Total Views |
sushant shing rajput_1&nb

 
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नोंदवलेल्या जबाबांपैकी कुठल्याही प्रकारे शंकास्पद माहिती आढळलेली नाही, असा खुलासा मुंबईचे आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. वांद्रे पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने करत आहेत. सुशांतच्या कुटूंबियांचे आणि या प्रकरणाशी संबंधित आम्हाला गरज वाटली त्या प्रत्येकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे, यात कुणीही सुशांतच्या आत्महत्येबद्दल कुणावरही संशय दाखल केलेला नाही, असे पोलीसांनी सांगितले आहे.



सुशांतच्या बँक खात्यातील व्यवहारांचा तपास सुरू आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात 56 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणाचा तपासही मालवणी पोलीसांमार्फत सुरू आहे. सुशांतच्या जवळच्या लोकांशी नोंदवलेल्या जबाबानुसार सुशांत नैराश्यात असल्याचे दिसत आहे, अशी माहितीही पोलीसांनी दिली आहे. या प्रकरणात कुणालाही संशय वाटत असेल किंवा मुंबई पोलीसांच्या तपासात कुठलीही शंका वाटत असेल तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन आयुक्त परमबीर सिंह यांनी दिले आहेत.



सुशांत सिंह प्रकरणात कुठल्याही राजकीय व्यक्तीचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सुशांतच्या कुटूंबियांशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, सुशांतच्या प्रकरणात ते सहकार्य करत नसल्याचा आरोपही पोलीसांनी केले आहे. या प्रकरणाचा तपास अगदी योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा मुंबई पोलीसांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात मुंबई महापालिकेने पाटणा एसपी विनय तिवारी होम क्वारंटाईन केले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलीसांना बळजबरीने क्वारंटाईन केले आहे, असा आरोप बिहार पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे.


बिहारहून आलेले पोलीस अधिकारी मुंबईतील गोरेगांव (पूर्व) मधील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) ग्रुप आठ विश्रामगृहात मुक्कामी आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभाग कार्यालयाला मिळाली. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने, त्यांना कोरोना संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरण (होम क्वारंटाइन) करणे आवश्यक होते. त्यामुळे महापालिकेचे पथक रविवारी सायंकाळी विश्रामगृहावर पोहोचले” असे पालिकेच्यावतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.



@@AUTHORINFO_V1@@