“पोलिसांना धमकी देणाऱ्या राऊत यांच्या मुलाविरोधात तक्रारही नाही?”

    दिनांक  03-Aug-2020 19:45:23
|

Nilesh Rane_1  
 
मुंबई : नुकतेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करत मनसे नेते अविनाश जाधव यांना तडीपारची नोटीस बजावण्यात आली. तसेच, सोमवारी ठाणे दिवाणी न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. आता याबाबत भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारला धारेवर धरत, “मनसेच्या नेत्याला तडीपारी लावली,पोलिसांना धमकी देणाऱ्या राऊत यांच्या मुलाविरोधात साधी तक्रारही नाही.” असे म्हंटले आहे.
 
 
 
 
 
भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट केले आहे की, “ मनसे नेता अविनाश जाधव यांना आंदोलन करताना अटक करण्यात आली व दोन वर्ष तडीपारची शिक्षा सुनावली. दुसऱ्या बाजूला शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा दारू पिऊन पोलिसांना धमकी देतो, तरी त्याच्यावर साधी तक्रार नाही. एक गोष्ट राज्य सरकारने विसरू नये… संधी सगळ्यांना मिळते.” असा टोमणा त्यांनी लगावला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.