रक्षाबंधनाची थाळी सजली...पण भाऊच नाही : सुशांतच्या बहिणीची व्यथा

03 Aug 2020 14:59:35
litle sushant on rakshaba

 
 
 
नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दररोज नव्या घडामोडी उघड होत आहेत, परंतू सुशांतच्या कुटूंबियांना दिलासा मिळेल, सुशांतला न्याय मिळेल, अशी एकही गोष्ट किंवा माहिती उघड झालेली नाही. दरम्यान, आज रक्षाबंधनानिमित्त सुशांतच्या बहिणीने भावूक होत पोस्ट शेअर केली आहे. गेल्या 35 वर्षांत पहिल्यांदाच रक्षाबंधनादिवशी माझं घरं सुनं झालंयं, राखी आहे, मिठाई आहे, रक्षाबंधनाची थाळी तयार आहे पण माझा भाऊच या जगात नाही, अशा भावना सुशांतची मोठी बहिण रानी हिने पोस्ट केल्या आहेत.
 
 
सुशांतच्या सर्वात जवळची बहिण असलेल्या रानीला आपलं दुःख अनावर होऊन बसले आहे. सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी अनपेक्षितरीत्या जगाचा निरोप घेतला. त्याने आत्महत्या केली, अशी तक्रार वांद्रे पोलीसांत नोंदवण्यात आली आहे. मात्र, आमच्या मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले, असा दावा बिहार पोलीसांकडे त्याच्या कुटूंबियांनी केला आहे. सुशांतच्या कुटूंबियांनी बिहार पोलीसांकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे.
 
 
सुशांतची बहिण आपल्या भावूक पोस्टमध्ये म्हणते, 'आज माझा दिवस आहे, आज तुझाही दिवस आहे, आज रक्षाबंधन आहे. 35 वर्षांत असं पहिल्यांदाच घडले आहे. माझ्या पूजेची थाळी सजली आहे, आरतीचा दिवाही सजला आहे. हळद-चंदनाचा टीळाही आहे, मिठाई पण आहे, राखी पण आहे फक्त तुझा चेहरा नाही, तु नाहीस माझा भाऊ नाही ज्याला मी इतकी वर्षे ओवाळले. ते लल्लाट नाही ज्यावर मी टिळा लावेन, तो हात नाही ज्यावर मी राखी बांधेन, तो भाऊच नाही ज्याचं तोंड मिठाईने गोड करेन, तो भाऊच नाही ज्याची मी गळाभेट घेईन. 
 
 
तु आलास आणि आमच्या आयुष्यात एक नव्या आशेचा किरण आला होता. तु साऱ्यांना स्वप्ने दाखवली होतीस, पण तु गेल्यानंतर जगणे नकोसे झाले आहे. आता समजत नाही की काय करू, तुझ्याविना जगायला शिकणे कठीण आहे. आयुष्यातील बरीच वर्षे आजचा दिवस येईल तेव्हा तू नसशील, ज्या ज्या गोष्टी आपण सोबत शिकलो, खेळलो बागडलो, तुझ्याशिवाय आता हे कसे शिकू तूच सांग, कायम तुझीच असणारी रानी दी.' या पोस्टवर अंकीता लोखंडेने कमेंट केली आहे. Diii, असे म्हणत हार्ट इमोजी कमेंट केला आहे.
 
 
 
सुशांतच्या आत्महत्येचा तपास महाराष्ट्र आणि बिहार या दोन्ही राज्यातील पोलीस करत आहे. बिहार पोलीस तपासासाठी मुंबईत पोहोचले आहेत. यामुळे पूर्वीपासून तपास करणाऱ्या मुंबई पोलीसांनी तूर्त तपासाची गती कमी केली आहे. बिहार पोलीसांनी मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. यामुळे मुंबई पोलीसांना पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
 
मुंबई महापालिकेने पाटणा एसपी विनय तिवारी होम क्वारंटाईन केले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या बिहार पोलीसांना बळजबरीने क्वारंटाईन केले आहे, असा आरोप बिहार पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे मुंबई पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत होते. आता मात्र, मुंबई महापालिकेलाही लक्ष्य करण्यात आले आहे. या प्रकारामुळे मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.

 
बिहारहून आलेले पोलीस अधिकारी मुंबईतील गोरेगांव (पूर्व) मधील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) ग्रुप आठ विश्रामगृहात मुक्कामी आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभाग कार्यालयाला मिळाली. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने, त्यांना कोरोना संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरण (होम क्वारंटाइन) करणे आवश्यक होते. त्यामुळे महापालिकेचे पथक रविवारी सायंकाळी विश्रामगृहावर पोहोचले” असे पालिकेच्यावतीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.











 
Powered By Sangraha 9.0