अभिनेत्री अक्षया गुरवचा “कथा तुमची, आवाज माझा” उपक्रम

    दिनांक  03-Aug-2020 15:39:44
|

akshaya _1  H x
 
 
 


मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला होता. कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे जगभरातील प्रत्येक नागरीकाकडे भरपूर वेळ शिल्लक होता. नागरीकांना मिळालेल्या या वेळेत काय करायचे? हा प्रश्न सतत त्यांना भेडसावत होता. या सगळ्यांमधून मराठमोळी अभिनेत्री अक्षया गुरवने “कथा तुमची, आवाज माझा” हा अनोखा उपक्रम सुरू केला.


अक्षयाने स्वत:च एक युट्यूब चँनल सुरू केलं. या यूट्यूब चँनलमध्ये चाहत्यांनी माझ्या इमेल आयडीवर मला पाठवलेल्या गोष्टी मी वाचणार आहे आणि त्यातील आवडलेल्याच गोष्टी मी माझ्या यूट्यूब चँनलवर प्रसिद्ध करणार आहे. त्यासाठी मी माझा इमेल आयडी सुद्धा माझ्या अकांऊटवर शेअर केला आहे. अक्षया गुरव नावाने यूट्यूब चँनल सुरू करण्याची संकल्पना ही माझ्या नव-याचीच आहे, असे अक्षया आवर्जून सांगते.

 
कोरोनामुळे मिळालेल्या विश्रांतीच्या काळात मी नववनवीन खाद्यपदार्थ, नृत्य, चित्रपट, वेबसिरीज आणि नवनवीन गोष्टी हे सगळं करून फार कंटाळले होते. मनामध्ये सारखं काहीतरी नविन करण्याचा विचार येत होता. आपण आयुष्यात अनेक गोष्टी वाचत व एकत असतो. पण त्या गोष्टींना योग्य तो न्याय मिळणे फार महत्वाचे असते.


 
काही-काही गोष्टी तर मनाला खूप भावतात, मनामध्ये घर करून बसतात. या सर्व गोष्टींना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मी माझ्या सोशल मिडिया अकांऊटवर माझ्या नविन यूट्यूब चँनलची घोषणा केली. चाहत्यांनी पाठवलेल्या गोष्टी मी माझ्या युट्यूब चँनलवर वाचून दाखवून त्यांना योग्य तो न्याय देऊ शकेल. आजपर्यंत मला एकूण १५० पेक्षा जास्त गोष्टी आल्या आहेत, असे अक्षयाने सांगितले.
 
 
 
 
 
 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.