सलग दुसऱ्या दिवशी रिया चक्रवर्तीची सीबीआय चौकशी!

    दिनांक  29-Aug-2020 13:54:15
|

rhea chakraborty_1 &


रिया चक्रवर्ती सीबीआयच्या प्रश्नांना उत्तरे देत नसल्याची सूत्रांची माहिती!


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचा आज नववा दिवस आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची आज पुन्हा चौकशी केली जात आहे. डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये तिची चौकशी सुरु आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी येताना आणि तेथून घरी परत जाताना रियाला सुरक्षा दिली जाणार आहे. तसे अपील सीबीआयने केली होती.


दरम्यान, ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) देखील आज रियाला चौकशीसाठी बोलवू शकतो. एनसीबीने मुंबईत २ ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांना अटक केली आहे. मात्र ही कारवाई कोणत्या प्रकरणात झाली आहे ते अद्याप समोर आलेले नाही.


सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू केल्याच्या आठव्या दिवशी शुक्रवारी सीबीआयने रिया चक्रवर्तीची १० तास चौकशी केली. सीबीआय समन्सनुसार रिया बँक खाती आणि इतर कागदपत्रांसह सकाळी ११च्या सुमारास चौकशीसाठी पोहोचली होती. सूत्रांनुसार, सीबीआयने रियाला सुशांतशी झालेली तिची पहिली भेट, घटनेआधी सुशांतशी झालेला वाद आणि पैशांच्या देवाणघेवाणीसह इतर अनेक प्रश्न विचारले. सुशांतचा फ्लॅटमेट राहिलेला सिद्धार्थ पिठानी, व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा हेही चौकशीत सहभागी झाले होते. रिया रात्री नऊच्या सुमारास डीआरडीओ गेस्टहाऊसमधून बाहेर पडली. तेथून तिने सांताक्रूझ पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या सोसायटीत काही पत्रकारांनी केलेल्या गैरवर्तनाविरोधात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांची एक टीम तिला घरी सोडायला गेली होती.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.