'ब्लॅक पँथर' फेम अभिनेता चॅडविक बोसमन यांचे निधन!

29 Aug 2020 12:32:23
Batman_1  H x W


मागील ४ वर्षे कॅन्सरशी झुंज देत असतानाही करत होता प्रेक्षकांचे मनोरंजन!

मुंबई : २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ब्लॅक पँथर'या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून झळकलेले चॅडविक बोसमन यांचे निधन झाले आहे. ते ४३ वर्षांचे होते. शुक्रवारी त्यांनी लॉस एंजिलिस येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबाने दिलेल्या ऑफिशिअल स्टेटमेंटमध्ये, चॅडविक जवळजवळ चार वर्षांपासून कोलोन कर्करोगाशी झुंज देत होते, असे म्हंटले आहे.


चॅडविक यांना २०१६ मध्ये तिसऱ्या स्टेजच्या कोलोन कर्करोगाचे निदान झाले होते. हा आजार २०२०पर्यंत चौथ्या स्टेजमध्ये पोहोचला होता. याकाळात त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आणि केमोथेरपीदेखील सुरु होती. मात्र उपचारादरम्यानही त्यांनी कामापासून ब्रेक घेतला नव्हता. या काळात त्यांनी 'मार्शल', 'डा ५ ब्लड्स' आणि 'मा रेनीज ब्लॅक बॉटम' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 'डा ५ ब्लड्स' आणि 'मा रेनीज ब्लॅक बॉटम' हे चित्रपट कोरोनामुळे प्रदर्शित होऊ शकले नाहीत.







"ते एक खरे लढवय्ये होते. त्यांनी अनेक शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी दरम्यान 'मार्शल'पासून 'डा ५ ब्लड्स' आणि 'मा रेनीज ब्लॅक बॉटम' पर्यंत अनेक चित्रपट केले. 'ब्लॅक पँथर'मधील किंग टी-चल्ला ही व्यक्तिरेखा साकारणे ही त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट होती.", असे कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे. चॅडविक यांनी त्यांच्या कर्करोगाबद्दल जाहीरपणे कधीच खुलासा केला नाही. त्यांच्या पश्चात आईवडील व पत्नी असा परिवार आहे.





Powered By Sangraha 9.0