विरुष्काकडे आनंदाची 'गोड' बातमी!

    दिनांक  27-Aug-2020 13:21:08
|

Virushka_1  H x


जानेवारी २०२१मध्ये विराट-अनुष्काच्या घरी होणार बाळाचे आगमन!


मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. अनुष्का आणि विराट आई-बाबा बनणार आहेत. स्वत: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट करुन आपल्या तमाम चाहत्यांना ही गूड न्यूज दिली आहे. सोबतच दोघांचा फोटोही शेअर केला आहे, ज्यात अनुष्का गरोदर असल्याचं स्पष्ट दिसत आहे.


चाहत्यांनीदेखील विराट-अनुष्काच्या पोस्टवर लाइक्स आणि अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. दरम्यान अनुष्काच्या प्रेग्नन्सीवरून बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांत ऐकायला मिळत होत्या. विरुष्काच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनुष्का गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र अनुष्काने वारंवार त्या अफवा असल्याचे स्पष्ट केले होते.टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी २०१७मध्ये विवाह केला होता. विराट आणि अनुष्का एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. त्या जाहिरातीवेळी विराट थोडा अस्वस्थ होता. अभिनयाबाबत विराटला तितकीशी माहिती नसल्यामुळे विराट ‘दबावात’ होता. मात्र या जाहिरातीनंतर विराट आणि अनुष्का यांचा एकमेकांशी संवाद वाढला. पुढे त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रुपांतरही झाले. मीडियात त्यांच्या अफेयरची चर्चा जोर धरु लागली. त्यानंतर २०१७मध्ये दोघे लग्न बेडीत अडकले.


इटलीतील विवाह सोहळ्याला अनुष्का आणि विराट यांचे कुटुंब आणि मोजक्या मित्रांसोबत जवळचे नातेवाईक उपस्थित होते. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईत त्यांनी दोन भव्य रिसेप्शन आयोजित केली होती. चाहते दोघांना ‘विरुष्का’ नावाने बोलवत असल्याने त्यांनी गुड न्यूज शेअर करताच हा शब्द सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.