वूटच्या 'द गॉन गेम'मधून उलगडणार एक नवा थरारक खेळ!

    दिनांक  27-Aug-2020 11:36:19
|

Gone Game_1  H


श्रिया पिळगांवकरसह संजय कपूर, अर्जुन माथूर, श्वेता त्रिपाठी शर्मा, रुखसार रेहमान, लुब्ना सलीम, इंद्रनील सेनगुप्ता, दिब्येंदू भट्टाचार्य दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत!


मुंबई : भारताची सर्वाधिक वेगाने विस्तारणारी अव्वल दर्जाची व्हिडिओ-ऑन-डिमांड सेवा ‘वूट सिलेक्ट’ने आपली नवी मोठी ओरिजिनल मालिका ‘द गॉन गेम’ प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. ‘असूर’, ‘मर्जी’, ‘द रायकर केस’ आणि ‘इल्लीगल’ यांसारख्या समीक्षकांनी गौरविलेल्या आणि लोकप्रिय मालिकांनंतर स्थळ आणि अवकाशाच्या सर्व मर्यादा ओलांडत मनाचा ठाव घेणारी, चित्तथरारक मालिका. प्रत्येक टप्प्यावर फसवणूक, संशय आणि अनपेक्षित वळणांनी श्वास रोखून धरायला लावणारी वूट सिलेक्टची ही मालिका प्रेक्षकांना एका जबरदस्त सफरीवर घेऊन जाईल.


कोरोना साथीच्या काळात, अवघा देश लॉकडाऊनमध्ये असताना एका व्यक्तीच्या अचानक नाहीस होण्याने ही गोष्ट सुरू होते. साहिल गुजराल बेपत्ता झालाय. तो विषाणूचा बळी ठरलाय की त्यामागे आणखी काही कारस्थान आहे? २०२० ने सारे जग कायमसाठीच बदलून टाकले आहे, पण गुजराल कुटुंबासाठी ही तर दु:स्वप्नाची फक्त सुरुवात आहे. संजय कपूर, अर्जुन माथूर, श्रिया पिळगांवकर, श्वेता त्रिपाठी शर्मा, रुखसार रेहमान, लुब्ना सलीम, इंद्रनील सेनगुप्ता, दिब्येंदू भट्टाचार्य अशी तगडी स्टारकास्ट लाभलेली आणि बोधी ट्री मल्टिमीडिया निर्मित द गॉन गेम मालिकेचे ‘वूट सिलेक्ट’वर स्ट्रिमिंग सुरू आहे.


लॉकडाऊनच्या काळात संपूर्णपणे आयसोलेशनमध्ये चित्रित झालेली ‘गॉन गेम’ ही मालिका रिमोट डायरेक्शनच्या माध्यमातून आणि अत्यंत कल्पक सिनेमॅटोग्राफीचा वापर करून साकारण्यात आली आहे. कसदार अभिनय आणि अतिशय अनोखा दृश्यानुभव यांची मेजवानी देणारी मालिका प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेईल व प्रत्येक टप्प्यावर एका नव्या रहस्याचा उलगडा करेल. निखिल नागेश भट दिग्दर्शित द गॉन गेम ही एक अद्वितीय आणि अभूतपूर्व अशी संकल्पना आहे, ज्यात अभिनेत्यांना त्यांच्या घरातूनच होणाऱ्या चित्रिकरणादरम्यान सर्जनशील स्वातंत्र्य देण्यात आले आहे.''
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.