रियाविरोधात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोतर्फे खटला

    दिनांक  26-Aug-2020 19:59:33
|
Rhea Chakraborty _1 

 
 
 
मुंबई : रिया चक्रवर्ती विरोधात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोतर्फे (एनसीबी) खटला दाखल करण्यात आला आहे. सक्तवसुली संचलनालयाने रियाच्या मोबाईलमधून डिलीट झालेले काही चॅट एक्सेस मिळवले असून ते एनसीबीकडे सोपवण्यात आले होते. यात रिया आणि सुशांतच्या ड्रग्ज कनेक्शन उघड झाले आहे. सीबीआयही या प्रकरणी पुन्हा या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे, सीबीआयने सुशांतच्या फ्लॅटमध्ये असलेल्या सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज सिंह आणि वॉचमनची चौकशी केली. अन्य दोन पोलीसांशीही चौकशी केली.
 
 
 
मानवाधिकार आयोगाने पाठवली कूपर रुग्णालयाला नोटीस
 
महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने कूपर रुग्णालय व मुंबई पोलीसांना एक नोटीस बजावली आहे. यात रिया चक्रवर्ती शवागरात गेली कशी हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासन आणि पोलीसांना या प्रकरणी जाब विचारण्यात आला आहे. कुठल्या नियमांअंतर्गत ही परवानगी देण्यात आली होती, असा प्रश्नही त्यात विचारण्यात आला आहे.
 
 
 
नारकोटिक्स ब्यूरो करणार रियाची चौकशी
 
एनसीबीचे पथक पुढील दोन दिवसांत रियाची चौकशी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रियाच्या मोबाईलमधून डिलीट करण्यात आलेले चॅट्स रिकव्हर करण्यात आले आहेत. १० ऑगस्ट रोजी रियाचा फोन जप्त करण्यात आला होता. त्यातून आता ड्रग्जचा उल्लेख केल्याने रिया पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. वकील सतीश मानशिंदे यांनी या थिअरीला नाकारत रिया कुठल्याही चौकशीला सामोरी जाण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. तिने कधीच ड्रग्ज घेतले नाही, असेही ते म्हणाले.
 
 
 
काय आहे चॅटमध्ये ?
 
रियाने हार्ड ड्रग्ज एडीएमचा उल्लेख आपल्या चॅटमध्ये केला आहे. हे एक पार्टी ड्रग आहे. सॅम्युअल मिरींटा याने स्टफ संपल्याची माहिती रियाला दिली होती. एका चॅटमध्ये साहाने रियाला म्हटले की, पाणी, चहा किंवा कॉफीमध्ये चार थेंब टाकून दिल्यानंतर ४० मिनिटे लागतील.
 
 
 
सीबीआय करणार मोठा खुलासा !
  
सुशांतचे वडील विकास सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ड्रग्ज प्रकरणाची चर्चा ज्या प्रकारे न्यूज चॅनल्समध्ये मंगळवारी केली जात होती. हे जर खरे असेल तर प्रकरण आणखी गंभीर वळणावर येऊन पोहोचणार आहे. सुशांतला जर ड्रग्ज दिले असेल तर हा आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा प्रकार असू शकतो. याची सर्व पैलूंनी चौकशी व्हायला हवी. सीबीआय मोठा खुलासा करेल, अशी आम्हाला खात्री आहे."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.