रिया चक्रवर्ती कूपर शवागारात गेलीच कशी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Aug-2020
Total Views |

rhea_1  H x W:


कूपर रूग्णालय आणि मुंबई पोलिसांना मानवाधिकार आयोगाची नोटीस


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे. महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाने कूपर रुग्णालय आणि मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीला शवागारात जाण्याची परवानगी कशी देण्यात आली यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. रियाला कोणत्या नियमांतर्गत परवानगी देण्यात आली आहे? असा सवाल आयोगाने रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांना केला आहे.


सुशांत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीचा आज सहावा दिवस आहे. सुशांतच्या फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीची सलग पाचव्या दिवशी चौकशी केली जात आहे. दुसरीकडे, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे मेसेज चॅट्स समोर आले आहेत. त्यानुसार, रिया एका ड्रग्ज डीलरच्या संपर्कात होती असे दिसून येत आहे. ही बाब समोर आल्यानंतर याप्रकरणी अमली पदार्थांच्या अँगलने आता चौकशी करणार असल्याचे अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाचे (एनसीबी) संचालक राकेश अस्थाना यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.



याप्रकरणी पैशांच्या अफरातफरीची चौकशी करणाऱ्या ईडीने रिया चक्रवर्तीचे काही व्हॉट्सअॅप चॅट्स सीबीआय आणि एनसीबी पथकाकडे सुपूर्द केले आहेत. तथापि याप्रकरणी काहीही माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, रियाने आजपर्यंत एकदाही अमली पदार्थांचे सेवन केलेले नाही, असा दावा रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी केला आहे.


दरम्यान सध्या रिया चक्रवर्तीचे मेसेज चॅटसमोर आले आहेत. यामध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करताना दिसत आहे. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलीट केले होते. यात पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे. हे मेसेज ८ मार्च २०१७चे आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने रियाचे हे चॅट सीबीआय तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडे दिले आहेत. १० ऑगस्ट रोजी ईडीने रियाचा फोन ताब्यात घेतला होता.



@@AUTHORINFO_V1@@