मराठी नाट्य व्यवसायाचा पुन:श्च हरिओम !

    दिनांक  26-Aug-2020 13:19:01
|
theater_1  H x





मुंबई : अलिकडेच 'मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघ'च्या पुढाकाराने नाट्य परिषदेच्या कलाकार संघ, रंगमंच कामगार संघ व व्यवस्थापक संघ या घटक संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची 'यशवंत नाट्यमंदिर-दादर' येथे बैठक संपन्न झाली.


या बैठकीत नाट्य व्यवसाय लवकरात लवकर पूर्ववत होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यात आला. त्यात शासन दरबारी यासंबंधी चर्चा करण्यासाठी 'विशेष समिती' गठीत करण्याचं एकमताने ठरविण्यात आले.


'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद' यांच्याशी समन्वय साधून नाट्य व्यवसाय संदर्भात ‘SOP’ नक्की करून शासनाशी बैठक लवकरात लवकर घेण्यात येणार आहे.


त्यानुसार प्रत्येक घटक संस्था यांच्याकडून समितीसाठी नियुक्त नावे पुढीलप्रमाणे-

मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ: संतोष काणेकर, ज्ञानेश महाराव, राहुल भंडारे, देवेंद्र पेम, भरत जाधव, ऐश्वर्या नारकर.

कलाकार संघ: प्रदीप कबरे, शरद पोंक्षे, सुशांत शेलार, वंदना गुप्ते.

रंगमंच कामगार संघ: रत्नकांत जगताप, संदीप नगरकर, किशोर इंगळे, प्रवीण गवळी, बापू सावळ, उल्लेश खांदारे, सतीश खवतोडे, रुचिर चव्हाण, आतिश कुंभार.

व्यवस्थापक संघ: प्रभाकर (गोट्या) सावंत, हरी पाटणकर, नितिन नाईक, नंदू पणशीकर.


अशी माहिती 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष भरत काणेकर आणि प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी दिली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.