अभिनेता सैफ अली खानही लिहिणार आत्मचरित्र!

    दिनांक  25-Aug-2020 15:03:23
|

Saif_1  H x W:


२०२१ मध्ये हार्पर-कॉलिन्स करणार सैफचे सैफचे चरित्र प्रकाशित!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने त्याचे आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. या पुस्तकात सैफ आपल्या आयुष्यातील उतार-चढ़ाव, कुटुंब, यश आणि अपयश, त्याच्या प्रेरणा आणि चित्रपटांबद्दल लिहिणार आहे. हार्पर-कॉलिन्स सैफचे चरित्र प्रकाशित करणार असून हे पुस्तक पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१मध्ये प्रसिद्ध होणार आहे. सैफच्या या आत्मचरित्रातून चाहत्यांना त्याच्या आयुष्यातील आतापर्यंत ठाऊक नाहीत, अशा काही घटनांची माहितीमिळणार आहे.


‘तानाजी’ फेम ओम राऊतच्या आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ चित्रपटात सैफ अली खान झळकणार असल्याचे वृत्त सध्या चर्चेत आहे. सैफ 'आदिपुरुष' चित्रपटात रावणच्या भूमिकेत दिसू शकतो, असेही म्हंटले जात आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रावणची भूमिका साकारण्यासाठी सैफ अली खानला संपर्क साधण्यात आला आहे. यापूर्वी सैफ अली खानने ‘तानाजी’मध्येही खलनायकाची भूमिका केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना त्याचे काम आवडले होते.


अलीकडेच 'आदिपुरुष' चे एक पोस्टर रिलीज करण्यात आले होते, ज्यावरून असे सूचित केले गेले आहे की हा एक पौराणिक चित्रपट असू शकतो. हा चित्रपट थ्रीडी अ‍ॅक्शन ड्रामा असेल. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होईल. चित्रपटात प्रभास ‘आदिपुरुष’ ही मुख्य’ भूमिका साकारताना दिसणार आहे.


या व्यतिरिक्त सैफच्या आयुष्यात आणखी एक आन्दाची बातमी आली आहे. करीना कपूर खान आणि सैफ अली खान दुसऱ्यांदा पालक बनणार आहेत. अलीकडे स्वत: सैफने याबाबत माहिती दिली आहे. सारा, इब्राहीम, तैमुर अशा तीन मुलांचा पिता असणाऱ्या सैफ अली खानने आपण पुन्हा एकदा पिता होणार असल्याचे ट्विट करत जाहीर केले होते. त्यामुळे आता त्याच्या आत्मचरित्रात नेमक्या कुठल्या गोष्टींचा खुलासा होणार आहे, याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.