सकाळी ११ ते १२च्या दरम्यान झालेला सुशांतचा मृत्यू!

24 Aug 2020 16:44:55

sushant_1  H x



रुग्णालय शवविच्छेदनाच्या अहवालात नव्हता मृत्यू वेळेचा उल्लेख!

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पहिल्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूच्या वेळेचा उल्लेख नसल्याने मुंबईतील कूपर रूग्णालयावर टीका झाली होती. त्यानंतर आता कूपर रुग्णालयाच्या वतीने सुशांतचा सप्लिमेंट्री पोस्टमार्टम रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, पोस्टमार्टम सुरू होण्याच्या १० ते १२ तास आधी सुशांतचा मृत्यू झाला होता. सुशांतचे पोस्टमार्टम १४ जून रोजी रात्री ११ ते १२.३० दरम्यान झाले होते. त्यानुसार सुशांतचा मृत्यू सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान झाला असावा, असे म्हटले जात आहे.


यापूर्वीच्या सात पानांच्या ऑटॉप्सी रिपोर्टमध्ये सुशांतच्या मृत्यूची वेळ नमूद करण्यात आलेली नाही. पण असे का केले गेले, याचे रुग्णालयाकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या प्रकरणात सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या ५ डॉक्टरांच्या टीमची मुंबई पोलिस आणि सीबीआय पथकांनी चौकशी केली आहे.


सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी मृत्यूची वेळ न दिल्याने पोस्टमार्टम अहवालावर प्रश्न उपस्थित केला होता. मृत्यूच्या वेळी ज्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता, त्याचा तपशील शवविच्छेदन अहवालात का नाही. शवविच्छेदन अहवालात मृत्यूची वेळ नमूद केलेली नाही. अखेर असे का केले गेले?, असा सवाल त्यांनी केला होता.


साधारणत: संध्याकाळनंतर पोस्टमार्टम होत नाही, मग सुशांतचे पोस्टमार्टम रात्री का केले? दिशा सालियनच्या पार्थिवाचे शवविच्छेदन दोन दिवसानंतर झाले होते, तर सुशांतच्या पोस्टमार्टममध्ये एवढी घाई का करण्यात आली? अखेर मुंबई पोलिस पोस्टमार्टम एवढ्या घाईत का केले होते?, असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.



Powered By Sangraha 9.0