‘शेमारू मराठीबाणा’ देणार ‘बाप्पाचा महाप्रसाद’!

    दिनांक  24-Aug-2020 15:44:19
|

Shemaroo marathi_1 &भाग्यवान विजेत्यांना मिळणार सोन्या-चांदीचा मोदक!

मुंबई : आपल्या लाडक्या गणरायाच्या मंगल आगमन झालेले आहे. सार्वजनिक मंडळांपासून ते घराघरात आकर्षक देखाव्यात, मखरात गणराज आता विराजमान झाले आहेत. बाप्पाची आरती, पूजा यांच्या जोडीला खास बाप्पांचा ‘मनोरंजनरुपी महाप्रसाद’ ‘शेमारू मराठीबाणा’ या वाहिनीकडून प्रेक्षकांना मिळणार आहे. नवनवीन उपक्रम.. कल्पक संकल्पना.. आकर्षक बक्षिसांची लयलूट.. उद्देश मात्र एकच... प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन! मनोरंजनाच्या या माध्यमातून ‘महाप्रसाद’ मिळवण्याची संधी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीच्या प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘बाप्पाचा महाप्रसाद’ या महास्पर्धेअंतर्गत शनिवार २२ ऑगस्ट ते मंगळवार १ सप्टेंबर दरम्यान ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांदरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणारे प्रेक्षक या बक्षिसांसाठी पात्र ठरतील.


ऐन गणेशोत्सावाच्या धामधूमीत प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनासोबतच चांदीचे व सोन्याचे मोदक जिंकण्याची संधी ‘बाप्पाचा महाप्रसाद’ या महास्पर्धेअंतर्गत मिळणार आहे. २२ ऑगस्ट पासून ते १ सप्टेंबरपर्यत सकाळी ११.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवरील चित्रपटांदरम्यान विचारल्या जाणाऱ्या ५ प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायची आहेत. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे नोंदविण्यासाठी टीव्ही वर दिसणाऱ्या ९२२२२००५६६ या नंबरवर मेसेज करायचा आहे. प्रत्येक दिवशी पाच चित्रपटांवर प्रत्येकी एक प्रश्न चित्रपटाच्या ब्रेकदरम्यान विचारले जाणार आहेत. दरदिवशी भाग्यवान ठरलेल्या ४ विजेत्यांना बक्षिसरुपी चांदीचा मोदक व स्पर्धेच्या शेवटी एका भाग्यवान विजेत्यास सोन्याचा मोदक मिळणार आहे. दर्जेदार मनोरंजक चित्रपटांसोबत बक्षिसरुपी ‘बाप्पाचा महाप्रसाद’ ही प्रेक्षकांसाठी खास पर्वणी असणार आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.