गणेश पूजा साहित्यात मास्क-सॅनिटायझरही 'अनिवार्य'

24 Aug 2020 17:26:00
Nilesh Sawant_1 &nbs



निलेश सावंत यांच्याहस्ते गणेश पूजा साहित्य वाटप

 
मुंबई : कोरोनाचे विघ्नाचे भान ठेवून यंदा गणेशभक्तांनी उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न यंदाच्या वर्षी केला आहे. मंडपात सोशल डिस्टंसिंग पाळत पूजा, आरती भजन आणि जागरण सुरू आहे. मात्र, प्रसाद आणि पूजेच्या साहित्यात आता मास्क आणि सॅनिटायझरही अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. याच पार्श्वभूमीवर मालाडमध्ये युवासेना युवा ब्रिगेड अधिकारी निलेश सावंत यांनी पूजेच्या साहित्याचे वाटप केले.
 
 
 
मास्क, सॅनिटायझरसह, अगरबत्ती, माचिस, कापूर, धूप, गुलाल, अबीर, गंधगोळी, कापूस आदी प्रकारच्या साहित्याचा एक संच गणेशभक्तांना वाटला आहे. 'कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. कन्टेंमेंट झोनमुळे काही ठिकाणी पूर्णपणे दुकानेही सुरू झालेली नाहीत, त्यातून काहीसा दिलासा मिळावा यासाठी हा उपक्रम सुरू केला अशी माहिती सावंत यांनी यावेळी दिली. पूजा किंवा आरतीवेळी हातांना सॅनिटायझर वापरू नका, असेही आवाहन यावेळी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 

Nilesh Sawant Nilesh Sawa 
Powered By Sangraha 9.0