कोरोनाला हरवून ‘बिग बी’ पुन्हा चित्रीकरणास सज्ज!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2020
Total Views |
Amitabh Bachchan _1 


अमिताभ बच्चन यांनी सुरु केले ‘केबीसी १२’चे चित्रीकरण!

मुंबई : चित्रपटसृष्टीचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात करत पुन्हा एकदा चित्रीकरणास सुरुवात केली आहे. तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर बिग बी पुन्हा एकदा प्रेक्षनाक्चे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. टीव्हीचा लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी)चे चित्रीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. बिग बी पुन्हा एकदा ‘केबीसी’चा १२वा हंगाम आपल्या चाहत्यांसमोर आणत आहे. केबीसी १२चा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आता चाहत्यांना या कार्यक्रमाच्या प्रसारणाची प्रतीक्षा आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत चित्रीकरणास सुरुवात झाल्याची बातमी आपली चाहत्यांना दिली. याचबरोबर, कोरोनासंदर्भात सेटवर आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचेही बिग बींनी सांगितले.


अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर करत लिहिले की, “सुरुवात झाली आहे. मी ‘केबीसी १२’च्या चित्रीकरणावर परतलो आहे.” या व्यतिरिक्त त्यांनी शूटिंगचे फोटो आपल्या ब्लॉगवर शेअर केले आहेत, ज्यात पीपीई किट्स परिधान केलेल्या क्रू मेंबर्सच्या सेटवर वावरताना दिसत आहेत.







चित्रीकरणावेळी सेटवर असलेले वातावरण कसे असते तेही त्यांनी चाह्त्यांसोबत शेअर केले आहे. त्यांनी लिहिले, चित्रीकरणाची सुरुवात झाली आहे. केबीसी १२चे वातावरण आनंददायी आहे. २००० साली केबीसीची सुरूवात झाली आणि आज २०२० सुरु आहे. बरीच वर्षे लोटली आहेत, हे अकल्पनीय आहे. सेटवर वावरताना खबरदारी, यंत्रणा, अंतर मास्क, स्वच्छता याद्वारे सेटची काळजी घेतली जात आहे. परंतु या भयंकर ‘कोविड १९’ नंतर जग कसे दिसेल? सेटवर सध्या कोणतीही तातडीची कामे असल्याशिवाय कोणीही कोणाशी बोलत नाही. पीपीई किट्स घातलेल्या लोकांमुळे सेट प्रयोगशाळेसारखा दिसतो, जेथे काही वैज्ञानिक प्रयोग करीत असल्यासारखे वाटते, अशा शब्दांत आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.












@@AUTHORINFO_V1@@