‘पबजी’च्या व्यसनामुळे १९ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

24 Aug 2020 17:12:32

PUBG_1  H x W:
 
मुंबई : सध्या लॉकडाऊनमुळे अनेक मुले घरी बसून आहेत. शाळा सुरु नसल्यामुळे सध्या पबजी या ऑनलाइन मोबाईल गेमचे वेड प्रचंड वाढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावामधील एका १९ वर्षीय तरुणाने स्वतःला गळफास लाऊन आत्महत्या केली. ‘पबजी गेम’मधील टास्क पूर्ण न झाल्यामुळे गौरव शामराव पाटेकर या १९ वर्षीय हे टोकाचे पाऊल उचलले. रायसोनी महाविद्यालय नागपूर येथे वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. मात्र, लॉकडाऊनमुळे तो गेले काही महिने आई-वडिलांसोबत त्याच्या घरी रहायला आला होता.
 
 
गौरव लॉकडाउनमध्ये दिवसरात्र ‘पबजी गेम’ खेळत होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी आणि घरच्यांनी पोलिसांना दिली. गेम खेळत असताना टास्क पूर्ण न झाल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री त्याने गळफास लावून आत्महत्या केली. सतत होणाऱ्या आत्महत्यांमुळे भारतात ‘पबजी गेम’वर बंदी आणावी, अशी मागणी पालक संघटनांकडून होत आहे. गेल्या काही महिन्यात लॉकडाऊनमुळे या गेममुळे होणारे मुलांवरील परिणाम ठळक दिसून आलेले आहेत.
Powered By Sangraha 9.0