पाकिस्तानात ८० वर्षे जुन्या मंदिरावर हातोडा

    दिनांक  23-Aug-2020 17:55:28
|
pakistan karachi_1 &
 
 
 
 
 
 
कराची : पाकिस्तानात हिंदूंवर सुरू असलेल्या अन्याय आणि अत्याचार थांबता थांबेना झाला आहे. प्रशासन, पोलीस आणि सरकारही नागरिकांना न्याय देऊ शकलेले नाहीत. स्वातंत्र्यापूर्वीचे एक प्राचीन हनुमान मंदिर येथे जमिनदोस्त करण्यात आले आहे. आजूबाजूला २० हिंदू कुटूंबांची घरेही तोडण्यात आली आहेत. इथे इमारत निर्माण होत असून विकासकाने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मूर्तीही गायब केल्या आहेत. पाकिस्तान सरकारने या बद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
 
 
 
 
पाच दिवसांनी या प्रकाराचा उलगडा झाला आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांनी आरोप केला आहे की, सहा महिन्यांपूर्वी ही जागा एका विकसकाने खरेदी केली. कॉलीनी तयार करण्यासाठी इथे असलेल्या २० हिंदू कुटूंबियांना एक प्राचीन हनुमान मंदिर हटवण्याची तयारी केली आहे. कोरोना महामारीमुळे हे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. ८० वर्षे जूने असलेल्या या मंदिराला गेल्या आठवड्यात सोमवारी बंद करण्यात आले होते. शुक्रवारी ही माहिती उघड झाली आहे.
 
 
 
 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंदू कुटूंबातील लोक एकत्र आले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. मंदिराचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. या प्रकरणाचा तपास होईल, अशी माहिती कमिश्नर अब्दुल करीम मेमन यांनी दिली आहे. लहानपणापासूनच या मंदिराशी आस्था जोडलेल्या आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.