'मास्टरप्लान' तयार! भारतीयांना मिळणार मोफत लस !

23 Aug 2020 12:42:40
covid 19_1  H x
 
 
 
 
नवी दिल्ली : केवळ भारताचे नाही संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या कोरोना लसीसंदर्भात एक महत्वाची माहिती उघड झाली आहे. 'बिझनेस टुडे'ने या संदर्भात वृत्त दिले आहे. कोरोनाची पहिली लस ७३ दिवसांमध्ये येणार असून 'कोव्हीशिल्ड', असे तिचे नाव आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटतर्फे तयार करण्यात आलेल्या या लसीला राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत परावर्तीत केले जाणार आहे. केंद्र सरकार देशभरात याचे लसीकरण सुरू करणार आहे. मात्र, कोव्हीशिल्डने या बद्दलचे वृत्त फेटाळून लावले आहे. 
 

कोरोनावर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने ‘कोविशिल्ड’ लस शोधून काढली असून, त्या लसीच्या उपलब्धतेविषयी काही माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केले होते. ते वृत्त सिरम इन्स्टिट्यूटनने फेटाळून लावले आहे. ‘कोविशिल्ड’ लसीच्या उपलब्धतेविषयी जे वृत्त काही माध्यमांनी दिले, ते खोटे असून अंदाजाने दिले असल्याचे सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे.
संपूर्ण जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. अशातच भारतानेदेखील लसीच्या चाचणी करण्यात आघाडी घेतली आहे. देशात कोरोनाच्या नियंत्रणाबरोबरच त्यावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. यात सिरम इन्स्टिट्यूटला यश आले असून, ‘कोविशिल्ड’ लसीच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, चाचण्या सुरू असतानाच ही लस ७३ दिवसांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. हे वृत्त सिरम इन्स्टिट्यूटनं फेटाळून लावले आहे.


 
यापूर्वी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी सात ते आठ महिने लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, १७ केंद्रांपेकी १६०० स्वयंसेवकांवर २२ ऑगस्टपासून ही चाचणी सुरू केली जात आहे. त्यात एका केंद्रात शंभरपर्यंत स्वयंसेवक आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीकरण आता तिसऱ्या टप्प्यात आले आहे. लस पूर्णपणे तयार असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


 
 
केंद्र सरकारला एकूण ६८ कोटी लसींची गरज
 
 
केंद्र सरकारने यापूर्वीही SII संस्थेला संकेत देऊन कोरोना लस खरेदी करणार असल्याचे म्हटले होते. देशभरात मोफत कोरोना लस पोहोचवण्याची तयारी सरकार करत आहे. पुढील जूनपर्यत सीरम इन्स्टिट्युटकडे ६८ कोटी लसींची गरद असल्याचेही म्हटले आहे. इतर ठिकाणी भारत बायोटेकद्वारे विकसित केली जाणारी कोवॅक्सिन आणि जाईडस कॅन्डीलाची ZyCoV-D या लसी मागवू शकतात.
 

 
१० कोटी लस तयार करणार सीरम इन्स्टिट्युट
 
 
भारत बायोटेकचे सीएमटी कृष्णा एल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना सुरक्षेच्या नियमांचे पालन करूनच लस निर्माण केली जाईल. त्याबाबतीत कुठलीही तडजोड किंवा शॉर्टकट घेतला जाणार नाही. दर महिन्याला सहा कोटी लसींची निर्मिती केली जाणार आहे. उत्पादन ६ कोटींवरून जून २०२१ १० कोटींवर नेण्याची तयारीही सुरू केली जाणार आहे.


Powered By Sangraha 9.0