चिनार महेश पुन्हा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला!

    दिनांक  21-Aug-2020 16:31:07
|
Chinar mahesh_1 &nbs


डिजिटल काळात संगीतकार ‘ऑनलाईन लाईव्ह इन कॉन्सर्ट’मधून प्रेक्षकांना करणार मंत्रमुग्ध!


मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकार हे आपल्या घरूनच आपल्या कलेचे सादरीकरण करत होते. सोशल मीडिया आणि ऑनलाईन व्हिडिओ अँपमुळे अनेक कलाकार स्वतःहून प्रेक्षकांपर्यंत पोहचत होते.


प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांना अप्रत्यक्ष का होईना पण मनोरंजन करताना पाहून फार आनंद होत होता. आता मात्र यात फक्त कलाकारच नसून संगीतकार आणि गायक सुद्धा सामील होत आहेत. होऊ दे व्हायरल एंटरटेनमेंट तर्फे नुकताच रोहन रोहन यांच्या ऑनलाईन लाईव्ह इन कॉन्सर्टचा सोहळा पार पडला. हा रोहन रोहन च्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताचा जोडीला स्पृहा जोशी हीच सूत्रसंचालन सुद्धा होत. संपूर्ण जगभरात गाजलेलं हे ऑनलाईन कॉन्सर्ट नंतर आता पुन्हा एकदा होऊ दे व्हायरलचे निर्माते कुणाल हेरकळ चिनार महेश यांच ऑनलाईन लाईव्ह इन कॉन्सर्ट घेऊन आले आहेत. या सोहळ्यात अनेक मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित असणार आहेत. या लाईव्ह इन कॉन्सर्टची संपूर्ण माहिती लवकरच सोशल मीडियाचा मार्फत देण्यात येणार असून हे कॉन्सर्ट सोशल डिस्टनसीगचे सर्व नियम पाळूनच करण्यात येणार आहे.
सध्या अनेक गोष्टी ऑनलाईन होत आहेत मग गायक कलाकारांनी का मागे राहावं म्हणून आम्ही ऑनलाईन लाईव्ह कॉन्सर्ट करण्याचं मनावर घेतल. आम्ही संगीतकार आमच्या त्यांच्या स्टुडिओमध्ये राहून गाणी संपूर्ण जगाला सुरांचा मैफिलीत न्हाहून टाकणार आहोत. पुन्हा एकदा नव्याने रसिक मायाबापाच्या सेवेत आम्ही कार्यरत होत आहोत.
- चिनार महेश, संगीतकारआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.