दिलीप कुमार यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन!

    दिनांक  21-Aug-2020 14:19:55
|
Dilip kumar_1  


दिलीप कुमार यांचे दोन्ही बंधूंना कोरोनाची;लागण झाल्याने रुग्णालय केले होते
दाखल!

मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू अस्लम खान यांचे निधन झाले आहे. अस्लम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याने मुंबई मध्ये वांद्रे परिसरातील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांना मधुमेह, हायपर टेंशन याचा त्रास होता, अशी माहिती रूग्णालयाकडून देण्यात आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अशा दीर्घकालीन आजार असलेल्यांमध्ये आजाराची गुंतागुंत अधिक वाढते. अस्लम यांना देखील को-मॉर्बिडीटीचा विळखा असल्याने सुरूवातीपासूनच धोका अधिक होता. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले.


अस्लम खान यांच्या सोबतच त्यांचे बंधू इशान खान यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याने रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची देखील प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.


वयवर्ष ८८ आणि अनेक आजारांचा विळखा असल्याने अस्लम खान यांचे पॅरामीटर्स सुरूवातीपासून खालावलेले होते. डॉ.जलील पारकर आणि डॉ. निखिल गोखले हे लीलावती मधील डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र उपचारादरम्यान अस्लम खान यांचे आज निधन झाले आहे. तर, ९० वर्षीय इशान खान रूग्णालयात आयसीयूमध्ये आहेत. सायरा बानू आणि दिलीप कुमार घरीच असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.