लॉकडाऊनच्या काळात ‘व्हर्च्यूअली’ करा बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना आणि उत्तर पूजा!

21 Aug 2020 17:38:53
Ganpati_1  H x

अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि गुरुजी अभिजित जोशी यांनी सादर केली आहे गणरायाची व्हर्च्युअल प्राणप्रतिष्ठापना व उत्तरपूजा!


मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या या काळात आज गुरुजींची तजवीज कशी करायची हा यक्षप्रश्न सर्वांसमोर असताना ‘व्हॅल्यूएबल ग्रुप’प्रस्तुत आणि ‘जीवनगाणी निर्मित’ गणरायाची प्राणप्रतिष्ठापना जीवनगाणीच्या युट्युब चॅनेलवरून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. प्राणप्रतिष्ठापना पूजेबरोबरच उत्तर पूजा कशी करावी, याचीही यथोचीत आणि शास्त्रशुद्ध माहिती या व्हिडीओंच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने दिली गेली आहे. त्यामुळे गणेशभक्त या व्हिडीओवरून या दोन्ही पूजा करू शकणार आहेत.


या दोन्ही पूजांचे यजमान प्रख्यात अभिनेते पुष्कर श्रोत्री असून ही पूजा अभिजित जोशी गुरुजी यांनी सांगितली आहे. प्राणप्रतिष्ठापना पूजा ही जवळजवळ ७० मिनटांची असून उत्तरपूजा ११ मिनटांची आहे. त्यात सर्व स्त्रोत्रे आणि प्रार्थना तसेच शेवटचे गाऱ्हाणे या सर्व बाबींचा समावेश आहे.


युट्युबवरील या पूजेच्या माध्यमातून आता घराघरात नियोजित वेळी पूजा करणे शक्य होणार आहे. युट्यूब चॅनेलवर हे व्हिडीओ अपलोड करण्यात आले असून ते गणपत्तीबाप्पाच्या आगमनाआधी तयार करून घेण्यासाठीही कामी येतील. प्रख्यात निवेदिका स्मिता गवानकर यांनी या पूजेचे निवेदन केले आहे.


पहिल्या दिवशीच्या प्राणप्रतिष्ठापना पूजेबरोबर गणरायाला निरोप देण्याच्या दिवशी करण्यात येणाऱ्या उत्तरपूजेसाठीही जीवनगाणी युट्युब वाहिनीवर उत्तरपूजा व्हीडीओ अपलोड करण्यात आला आहे. या वाहिनीवर नोंदणी करून म्हणजेच सबस्क्रईब करून हे व्हीडीओ तुम्ही पाहू शकता.











Powered By Sangraha 9.0