कदाचित बॉलीवूड माफियांच्या दबावामुळे साराने सुशांतशी नाते तोडले!

    दिनांक  20-Aug-2020 15:15:32
|

Sara_1  H x W:


सुशांतच्या मित्राचा सारा-सुशांतच्या नात्याबद्दल गौप्यस्फोट!


मुंबई : सारा अली खानने सुशांत सिंह राजपूतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातली दोघांमधील केमिस्ट्री आणि अभिनय लोकांना खूप आवडले होते. त्याचबरोबर, या दरम्यान सारा आणि सुशांतमध्ये प्रेम फुलात असल्याचे सुशांतचा जवळचा मित्र सॅम्युएल ह्योकिपने म्हंटले आहे. 'केदारनाथ' चित्रपटाच्या चित्रीकरण आणि प्रदर्शनादरम्यान सुशांत आणि साराच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा रंगली होती, मात्र त्यावेळी अफवेचे नाव देत ही चर्चा थांबविण्यात आली होती. तथापि, आता सुशांतच्या मित्राने सारा त्याच्या प्रेमात असल्याच्या वृत्ताची पुष्टी केली. परंतु २०१९मध्ये प्रदर्शित झालेला सुशांतचा 'सोनचिरिया' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर साराने हे संबंध तोडले, असा आरोप त्याने केला आहे.


सॅम्युएलने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले- 'मला आठवते सारा आणि सुशांत केदारनाथच्या प्रमोशन दरम्यान प्रेमात होते. एकमेकांमधे खूप आदर होता, आजकाल नात्यात क्वचितच दिसतो. साराला सुशांत व त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांविषयी आदर होता. मग ते कुटुंब असो, मित्र असो आणि अगदी कर्मचारी असोत. मला आश्चर्य वाटते की ‘सोनचिरिया’च्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीनंतर साराने सुशांतबरोबर ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. कदाचित बॉलीवूड माफियांच्या दबावामुळे साराने सुशांतशी नाते तोडले.’, असे म्हणत त्याने या प्रकरणात सारा अली खानलाही दोषी ठरवले आहे.सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत सारा अली खानने सोशल मीडियावर सुशांतचा एक फोटो शेअर केला होता. यानंतर सुशांतचा अखेरचा चित्रपट 'दिल बेचार' प्रदर्शित झाल्यावर साराने सैफ आणि सुशांतसोबतचे एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर सारा अली खान खूप दुःखी झाली होती. त्यानंतर आता सॅम्युअलने केलेल्या आरोपानंतर पुन्हा एकदा या प्रकरणाची नवी बाजू समोर येत आहे. सध्या सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सुपूर्द केले असून, सीबीआयने तपासाला सुरुवात केली आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.