प्रसिद्ध चित्रकार राम कामत यांची आत्महत्या!

    दिनांक  20-Aug-2020 13:42:00
|
Ram _1  H x W:


राहत्या घरातील बाथटबमध्ये आढळला मृतदेह!

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध चित्रकार आणि छायाचित्रकार राम इंद्रनील कामत यांचा मृतदेह बुधवारी रात्री त्यांच्या माटुंगा स्थित फ्लॅटमधील बाथटबमध्ये आढळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्या म्हणून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.


घटनास्थळावरून एक सुसाइड नोटही सापडली आहे. यात राम यांनी आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हंटले आहे. त्यांचा मृत्यू विषबाधामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर याची पुष्टी होईल.


४१ वर्षीय राम कामत बऱ्याच काळापासून नैराश्यात होते, त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र, लॉकडाऊन कालावधीत त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती, असे सांगितले जात आहे. ते आपल्या आई आणि बहिणीसमवेत राहत होते. राम इंद्रनील कामत यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांची पोलिस चौकशी करत आहेत.


राम कामत यांच्या आईने चौकशी दरम्यान सांगितले की, बुधवारी संध्याकाळी ते अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेले होते आणि बराच काळ उलटूनही बाहेर आले नाहीत. यानंतर आईने शेजारी राहणा-या लोकांना बोलावले आणि बाथरुमचे दार तोडले असता ते बेशुद्धावस्थेत बाथटबमध्ये आढळले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.