पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का? मनसेचा सवाल

20 Aug 2020 16:11:12

mns_1  H x W: 0
 
 
मुंबई : शिवसेना आणि पुत्रप्रेम हे समीकरण आपल्याला काही नवीन नाही. आता महापौरांवर कोविड सेंटरचे कंत्राट मुलाकडे दिल्याचा आरोप केला जात आहे. “आपल्याच मुलाला कोविड सेंटरचे काम देत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांनी सगळ्यात आधी राजीनामा दिला पाहिजे.” अशी मागणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. पुढे ‘पुत्र-मोहातून शिवसेना बाहेर निघेल का?’ असा सवालदेखील विचारला आहे.
 
 
‘कोरोनाच्या काळात राजकारण करु नका, या संकटाशी आपण एकत्र लढू असे, आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतात. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांकडून महानगरपालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार केला जात आहे. कोविड सेंटर आणि जम्बो सेंटरच्या कामात मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. किशोरी पेडणेकर यांनी पदाचा गैरवापर करून स्वतः च्या मुलाच्या कंपनीला काम मिळवून दिले. साईप्रसाद किशोर पेडणेकर यांच्या कंपनीने गैरमार्गाने हे काम मिळवल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच आपण केलेला भ्रष्टाचार समोर येऊ नये यासाठी महानगरपालिका सभागृह चालू केले जात नाही. पंतप्रधानांपासून सर्वजण व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना मुंबई महानगरपालिका बंद का, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
Powered By Sangraha 9.0