भूमिपूजनासाठी प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराची माती अयोध्येला

02 Aug 2020 17:10:52

ram_1  H x W: 0
 
उल्हासनगर : उल्हासनगराहून वाहणाऱ्या उल्हासनदीचे पवित्र जल व अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराची पवित्र माती काल अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी बजरंग दल व विश्व हिंदु परीषदेच्या वतीने स्पीडपोस्टद्वारे पाठविण्यात आली. भाजपचे नगरसेवक महेश सुखरामानी यांनी पत्रकारांशी बोलतांना माहिती दिली. अयोध्येत साकारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदीराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
 
 
 
या शुभ दिनाचे औचित्य साधून उल्हासनदीचे पवीत्र जल व अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिराची पवित्र माती आज बजरंग दल व विश्व हिदू परीषदेच्या कार्यकर्त्यांनी स्पीड पोस्टद्वारे अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी पाठवली आहे. उल्हासनगर नंबर दोन येथील चद्रशेखर आझाद शाळे जवळील हनुमान मंदिरात वैदिक पध्दतीने होम हवन करून उल्हासनदीचे पवित्र जल व पांडवकालीन शिवमंदिराची पवित्र मातीची पूजा करण्यात आली. यावेळी बजरंग दलाचे व विश्व हिंदू परिषदचे चंद्रकांत मिश्रा, महेश सुखरामानी, डॉ.एस.बी.सिंग, कमलेश निकम आदी रामभक्त प्रामुख्याने उपस्थित होते.




Powered By Sangraha 9.0